Home /News /entertainment /

HBD: सलमानशी पंगा घेणारी सोना मोहपात्रा झाली बेरोजगार; घर खर्चासाठीही नाहीत पैसे

HBD: सलमानशी पंगा घेणारी सोना मोहपात्रा झाली बेरोजगार; घर खर्चासाठीही नाहीत पैसे

बॉलिवूडशी दोन हात करणारी गायिका कामाच्या शोधात; सेव्हिंगही संपल्यामुळं सापडली आर्थिक संकटात

    मुंबई 17 जून: कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. (Coronavirus) अन् या वाढत्या संक्रमणाचा मोठा फटका मनोरंजनसृष्टीला देखील बसला आहे. निर्मात्यांना कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. अनेक नामांकित सेलिब्रिटी बेरोजगार झाले आहेत. अशी काहीशी अवस्था प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा (Sona Mohapatra) हिची देखील झाली आहे. सलमान खान (Salman Khan), अनु मलिक (Anu Malik), सोनू निगम (Sonu Nigam) यांसारख्या लोकप्रिय कलाकारांशी पंगा घेणारी सोना सध्या बेरोजगार आहे. तिचं सगळ सेव्हिंग संपलं असून सध्या ती आर्थिक संकटात अडकली आहे. आज सोनाचा वाढदिवस आहे. (sona mohapatra birthday) तू आर्थिक संकटातून लवकरच बाहेर येशील अशा शुभेच्छा तिला चाहत्यांनी दिल्या आहेत. सोना मोहपात्रा आपल्या रोखठोक प्रतिक्रियांसाठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीपासून देशभरातील राजकारणापर्यंत अनेक विषयांवर ती आपलं मतं रोखठोकपणे मांडते. यामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी ती मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. अनेक नामांकित कलाकारांशी पंगा घेतल्यामुळं तिला बॉलिवूडमधून मिळणारं काम देखील थांबलं आहे. शिवाय कोरोनामुळं तिचे लाईव्ह शो बंद झाले आहेत. तसंच जे काही पैसे तिच्याकडे होते ते तिनं एका चित्रपटात गुंतवले. कोरोनामुळं तिला तिथं देखील नुकसान झालं. त्यामुळं आता तिच्यावर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला आहे. चित्रपटात फ्लॉप पण गरोदरपणामुळं हिट; लिसा हेडनला फोटोशूटसाठी मिळतंय कोट्यवधींचं मानधन HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास सोनानं स्वत: ट्विट करुन आपली सद्य परिस्थिती सांगितली. “माझं संपूर्ण सेव्हिंग शटअप सोना या चित्रपटामध्ये खर्च झालं. कोरोनामुळं स्टेज शो बंद आहेत. परिणामी मी सध्या आर्थिक संकटात आहे. सध्या मी दु:खात आहे पण खात्री आहे की लवकरच मी यातून बाहेर पडेन.” असं म्हणत तिनं आपलं दु:ख व्यक्त केलं. आज सोनाचा वाढदिवस आहे. तू आर्थिक संकटातून लवकरच बाहेर येशील अशा शुभेच्छा तिला चाहत्यांनी दिल्या आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Playback singer, Singer

    पुढील बातम्या