मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सलमान खानच्या 10 वर्षीय पुतण्याला कोरोनाची लागण; वाचा डिटेल्स

सलमान खानच्या 10 वर्षीय पुतण्याला कोरोनाची लागण; वाचा डिटेल्स

करीना कपूर खान आणि अमृता राव यांच्यानंतर अभिनेता सोहेल खानची   (Sohel Khan Wife)  पत्नी सीमा खान आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे चार सेलिब्रिटी वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन आहेत.

मुंबई, 15 डिसेंबर- करीना कपूर खान आणि अमृता राव यांच्यानंतर अभिनेता सोहेल खानची   (Sohel Khan Wife)  पत्नी सीमा खान आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे चार सेलिब्रिटी वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन आहेत. दरम्यान, बीएमसीने या प्रकरणाशी संबंधित आणखी एक अपडेट दिली आहे. बीएमसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सोहेलची पत्नी सीमा खान आणि त्याचा 10 वर्षांचा मुलगा   (Sohel Khan Son)  योहान खान   (Yohan Khan)  यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. योहानशिवाय सीमाच्या बहिणीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

सीमा खानची बिल्डिंग बीएमसीने सील केलं आहे. बीएमसीने बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना चाचणीच्या अहवालाच्या आधारे बिल्डिंग डी-सीलिंग करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाईल. याआधी बीएमसीने करीना कपूर आणि करण जोहरच्या बिल्डिंगलासुद्धा सील आणि निर्जंतुकीकरण केले आहे.

करीना कपूर खान, अमृता अरोरा आणि इतर अनेक सेलिब्रिटी 8 डिसेंबर रोजी करण जोहरच्या घरी एका पार्टीत सहभागी झाले होते. सीमा खान ही कोरोना पॉझिटिव्ह असलेली पहिली सेलिब्रिटी होती. त्यानंतर करीना आणि अमृताच्याही कोरोना टेस्ट झाल्या, ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बीएमसीने करीना कपूरची बिल्डिंगही सील केली आहे.

महीप कपूरदेखील करण जोहरच्या पार्टीत सहभागी झाली होती. तिचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. एका न्यूज पोर्टलशी बोलताना, महीपचे पती अभिनेता संजय कपूर यांनी याचा खुलासा केला आहे.यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, "होय ती सौम्य लक्षणांसह कोविड पॉझिटिव्ह आहे आणि ती सेल्फ-आयसोलेशनमध्ये आहे. आमचा मुलगा जहाँ, मुलगी शनाया आणि मी देखील आमची चाचणी केली आणि आमचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Salman khan