‘India’s Got Talent’ चे निर्माते सोहन चौहान यांचा मृत्यू

‘India’s Got Talent’ चे निर्माते सोहन चौहान यांचा मृत्यू

सोहन यांचा मृतदेह रविवारी रात्री उशीरा मुंबईच्या रॉयल पाम्स तलाव, आरे कॉलनी या ठिकाणी संशस्पदरित्या आढळून आला.

  • Share this:

मुंबई, 18 जून : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आणि ‘मास्टरशेप इंडिया’ सारख्या रिअ‍ॅलिटी शोसाठी काम केलेले सीनिअर प्रोड्युसर सोहन चौहान यांचं निधन झालं असून त्यांचा मृतदेह रविवारी रात्री उशीरा मुंबईच्या रॉयल पाम्स तलाव, आरे कॉलनी या ठिकाणी संशस्पदरित्या आढळून आला. पोलिसांनी त्यांचं शव पोस्टमॉर्टमसाठी सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पाठवलं असून त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा शोध मुंबई पोलिस घेत आहेत.

VIDEO : पराभवानंतर रणवीरच्या गळ्यात पडून रडला पाकिस्तानी फॅन

सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचा मृत्यूचं कारण सध्या तरी आत्महत्या मानलं जात असलं तरीही पोलिसांना कोणताही संशयास्पद पुरावा मिळाल्यास हे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोहन यांचं 6 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं आणि मुंबईमध्ये ते आपल्या पत्नीसोबत राहत होते मात्र ही घटना घडली त्यावेळी त्यांची पत्नी घरी नव्हती. ती दिल्लीला गेली होती आणि सोहन घरी एकटेच होते. सूत्राच्या माहितीनुसार त्यांच्या कामवाल्या बाईनं त्यांना शेवटचं जिवंत पाहिलं होतं. तसेच सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहणाऱ्या सोहन यांनी शेवटची पोस्ट 13 जूनला केली केली होती.

शरीरावर कोणत्याही मारहाणीच्या खुणा नाहीत

तलावाच्या आसपासच्या परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी 7.35 वाजता आरे कॉलनीमधील रॉयल पाम्स तलावात त्याचा मृतदेह तरंगताना दिसला. सध्या तरी पोलिसांनी याला अपघाती मृत्यू घोषित केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोहन यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत.

'या' कारणासाठी हॉलिवूड अभिनेत्रीनं स्वतःच शेअर केले न्यूड फोटो

घरात आढळली रमची रिकामी बाटली

सोहन यांचा मृतदेह रॉयल पाम्स तलावात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यावर पोलिसांनी ते राहत असलेल्या इमारतीचं CCTV फुटेज तपासलं असता, सोहन रात्री उशीरा आपल्या घरातून निघताना दिसले. त्यावेळी त्यांच्या हातात एक बाटली होती. सोहन यांचे कुटुंबीय घरी पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केली असता त्यांच्या घरात रमची एक रिकामी बाटली आणि एक डायरी मिळाली ज्यात सोहन त्यांच्या कविता लिहून ठेवत असत.

Nach baliye 9 : प्रोमोमध्ये उर्वशी ढोलकिया सोबत दिसणारा 'तो' आहे तरी कोण?

First published: June 18, 2019, 10:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading