मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

B’day बॉय Sohail Khan ने पळून जाऊन सीमासोबत केलं होतं लग्न, अशी आहे लव्हस्टोरी

B’day बॉय Sohail Khan ने पळून जाऊन सीमासोबत केलं होतं लग्न, अशी आहे लव्हस्टोरी

Sohail Khan

Sohail Khan

अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सोहेल खान (Sohail Khan ) आज आपला 51 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 20 डिसेंबर: अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सोहेल खान (Sohail Khan ) आज आपला 51 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 20 डिसेंबर 1970 मध्ये जन्मलेल्या सोहेल खानने डायरेक्टर आणि प्रोड्यूसर म्हणून सिनेसृष्टीत पाउल ठेवले होते. पण म्हणावे तसे त्याला यश प्राप्त झाले नाही. सोहेल खान म्हणायला अभिनेता आणि निर्माता आहे. पण सलमान खानचा भाऊ (Salman Khan)हीच त्याची ओळख जास्त मोठी आहे. सोहेलने अनेक चित्रपटात भूमिका केल्यात. पण त्याला म्हणावे तसे यश लाभले नाही. अर्थात आज आम्ही सोहेलच्या फिल्मी करिअरबद्दल नाही तर त्याच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत.

सोहेलचे अक्टींग करिअर

सोहेल खानने 1997 मध्ये दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. ‘प्यार किया तो डरना क्या’ हा दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला सिनेमा होता. दिग्दर्शक म्हणून हिट ठरल्यानंतर सोहेल खानने 2002 मध्ये अभिनयात हात आजमावला. 'मैंने दिल तुझको दिया' या चित्रपटात अभिनयासोबतच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली होती.

या चित्रपटाची कथा त्याने स्वतःच लिहीली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली होती. यानंतर सोहेल खानने 'लकीर', 'कृष्णा कॉटेज', 'फाईट क्लब', 'किसान', 'ऐश', 'हॅलो', 'हीरोज' असे अनेक चित्रपट केले, पण तो त्याचा भाऊ सलमान खानसारखा अभिनय करण्यात यशस्वी झाला नाही.

सोहेल खानने बहुतेक सलमान खानच्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

अशी आहे लव्हस्टोरी

सोहेल खानने 1997 मध्ये दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. ‘प्यार किया तो डरना क्या’ हा दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला सिनेमा होता. याच दरम्यान एक मुलगी फॅशन डिझाईनिंगमध्ये करिअर करण्यासाठी दिल्लीतून मुंबईला आली.

सोहेल व तिची योगायोगाने भेट झाली आणि पहिल्याच नजरेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. या मुलीचे नाव होते. सीमा सचदेव. आज सीमा सोहेल खानची पत्नी आहे.

सीमा व सोहेल लग्न करू इच्छित होते. पण या लग्नाला कुटुंबाचा विरोध होता. परंतु, ज्या दिवशी ‘प्यार किया तो डरना क्या’ रिलीज झाला, त्याचदिवशी सोहेल व सीमा दोघेही घरातून पळाले आणि आर्य मंदिरात दोघांनीही लग्न केले.

अर्थात यानंतर दोन्ही कुटुंबानी हे लग्न मान्य केले. यानंतर सोहेल व सीमाचा ‘निकाह’ही झाला. या दोघांना निर्वान व योहान अशी दोन मुले आहेत.

सोहेलने लग्नानंतर निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. पण निर्माता म्हणून तो फार यश मिळवू शकला नाही. सीमाने मात्र फॅशन डिझाईनिंग क्षेत्रात मोठे नाव कमावले. अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांसाठी ती फॅशन डिझाईनिंग करते.

सीमा ग्लॅमरस आयुष्य जगते. फारशी लाईमलाईटमध्ये नसली तरी बॉलिवूडच्या पार्ट्यांना मात्र ती हमखास दिसते.

First published:

Tags: Entertainment, Salman khan