Home /News /entertainment /

सोहा अली खानची लेक म्हणतेय गायत्री मंत्र, कोरोना दरम्यान व्हायरल झाला VIDEO

सोहा अली खानची लेक म्हणतेय गायत्री मंत्र, कोरोना दरम्यान व्हायरल झाला VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओेमध्ये सोहा अली खानची लेक इनाया बोबड्या बोलात गायत्री मंत्र म्हणताना दिसत आहे.

  मुंबई, 24 एप्रिल : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग ठप्प झालं आहे. जगातल्या जवळपास सर्वच देशात या व्हयरसनं थैमान घातलं असून दिवसेंदिवस याचं संक्रमण वाढताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण जग हा व्हायरस लवकरात लवकर नष्ट व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे. अशात अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांची लेक इनायाचा गायत्री मंत्र म्हणतानाचा एक जुना व्हिडीओ सोशल माडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओेमध्ये सोहा अली खानची लेक इनाया बोबड्या बोलात गायत्री मंत्र म्हणताना दिसत आहे. सध्या कोरोनाच्या या जागतिक संकटा दरम्यान तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल माडियावर व्हायरल होतं आहे. मात्र हा व्हिडीओ आताचा नाही तर मागच्या वर्षीच्या रक्षाबंधनचा आहे. ज्यात कुणाल खेमूची बहीण त्याला ओवाळताना दिसत आहे. तर इनाया त्याच्या बाजूला उभी राहून गायत्री मंत्र म्हणत आहे. Voompla या पॅपराजी पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी तोडणार 'गंगूबाई काठियावाडी'चा सेट, वाचा काय आहे कारण
  इनायाचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. यावर अनेकाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. अनेकांनी लहानग्या इनायाचं कौतुक केलं आहे. कुणाल खेमू आणि सोहा याची लेक इनाया बॉलिवूडच्या पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. याआधी तिचे भाऊ तैमुरसोबतचे काही व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहे. लॉकडाऊनमध्ये पार्टी केल्याचा आरोप, अभिनेत्री अनिता राजच्या घरी पोहोचले पोलीस
  View this post on Instagram

  Flipping into the weekend. #girlpower #toddlerpower

  A post shared by Kunal Kemmu (@khemster2) on

  याशिवाय कुणाल आणि सोहा सुद्धा इनायाचे व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच कुणालनं इनायाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती बाबा कुणासोबत फ्लिप करताना दिसत आहे. ज्यावर शाहिद कापूर, अमृता खानविलकर, इशान खट्टर यांनी कमेंट करत इनायाचं कौतुक केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. Bigg Boss फेम शहनाझ गिलनं चीनला त्यांच्याच भाषेत दिली ताकीद, पाहा VIRAL VIDEO
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Soha ali khan

  पुढील बातम्या