• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • धक्कादायक! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायिकेने चाहत्याच्या तोंडावर केली 'लघुशंका'; VIDEO समोर येताच संतापले युजर्स

धक्कादायक! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायिकेने चाहत्याच्या तोंडावर केली 'लघुशंका'; VIDEO समोर येताच संतापले युजर्स

गेल्या आठवड्यामध्ये परदेशात एक लाईव्ह कॉन्सर्ट झाला होता. त्यामध्ये एक अशी घटना घडली जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होताच लोकांनी प्रचंड प्रमाणात त्यावर टीका केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर-  जगामध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात. जे पाहून सर्वसामान्य लोकांना धक्का बसतो, तर कधी त्या गोष्टीचा किळस वाटतो. असंच काहीसं घडलं आहे एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये  (Live Concert). गेल्या आठवड्यामध्ये परदेशात एक लाईव्ह कॉन्सर्ट झाला होता. त्यामध्ये एक अशी घटना घडली जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर  (Viral Video) व्हायरल होताच लोकांनी प्रचंड प्रमाणात त्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका गायिकेने असं काही केलं के ते पाहून सर्वांनाच तिचा किळसही आला. प्रसिद्ध गायिका (Singer) सोफिया उरिस्ताने   (Sofia Urista)  भर कॉन्सर्टमध्ये आपल्या एका मेल फॅनच्या तोंडावर लघुशंका करण्यासारखा धक्कादायक प्रकार केला आहे. हा व्हिडीओ समोर येताच सर्व स्थरातून तिच्यावर टीका होत आहे. गेल्या आठवड्यात सोफिया उरिस्ता आपल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गात होती. त्यावेळी ती अतिशय उत्साहात होती. मात्र गाता-गाता अचानक तिनं आपल्या एका मेल फॅनला स्टेजवर बोलावलं आणि त्याला स्टेजवर झोपवून त्याच्या तोंडावर चक्क लघुशंका केली. हा प्रकार पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर गायिकेची प्रचंड निंदा होत होती. त्यांनतर गायिका सोफिया उरिस्ताने आपल्या सोशल मीडियावरवरून एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण देत आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. पोस्ट शेअर करत सोफियाने लिहिले आहे, '“सर्वांना नमस्कार, मला डेटोना येथील रॉकविले मेटल फेस्टिव्हलमधील माझ्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे आहे. संगीत आणि रंगमंचावर मी नेहमीच माझ्या मर्यादा पाळल्या आहेत. त्या रात्री, मी मर्यादा विसरले. मला माझ्या कुटुंबावर, बँडवर आणि चाहत्यांवर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम आहे आणि मला माहित आहे की मी जे काही केले त्यामुळे काही लोक दुखावले आहेत. किंवा नाराज झाले आहेत. मी त्यांची माफी मागते आणि त्यांना सांगू इच्छिते की आहे की त्यांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,” गायिकेच्या या ट्विटनंतर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यांनतर गायिकेच्या बँडनेदखल आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत सर्वांची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलं आहे, 'कि जे काही झालं याची कोणालाही कल्पना नव्हती. असं काही होईल याचा जरासाही अंदाज नव्हता. सर्वकाही अचानक घडलं. सोफिया कॉन्सर्ट दरम्यान फारच उत्साहित झाली होती. तिच्या अति उत्साहात हे सर्व काही घडून गेल्याचं सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: