अरे देवा! सारा अली खानला भिकारी समजून लोकांनी दिले पैसे, पाहा VIDEO

अरे देवा! सारा अली खानला भिकारी समजून लोकांनी दिले पैसे, पाहा VIDEO

साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मे : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच काही ना काही कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या लॉकडाऊनमध्येही सारा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. अनेकदा ती तिचे फनी व्हिडीओ शेअर करत असते. पण मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूड सेलिब्रेटींचे थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत यात साराचा सुद्धा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तिनं तिच्यासोबत घडलेल्या या मजेदार घटनेचा खुलासा केला आहे.

सारानं एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. त्याचाच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिची ही मुलखत कदाचित तिच्या डेब्यू सिनेमाच्या वेळची असावी. या व्हिडीओमध्ये सारा सांगते, 'आम्ही त्यावेळी परदेशात होतो. आई-बाबा दोघंही शॉपिंगसाठी आत गेले होते आणि मी माझ्या भावासोबत बाहेरच थांबले होते. त्यांना यायला उशीर होता. मी अचानक डान्स करायला सुरुवात केली आणि तिथल्या लोकांना वाटलं की, मी भिकारी आहे. त्यामुळे त्यांनी मला पैसे दिले.'

सोनू सूदनंतर आता अमिताभ बच्चन यूपीच्या मजूरांना करणार मदत, असा आहे प्लान

सारा पुढे म्हणाली, 'ते असं का करत आहेत हे मला माहित नव्हतं. मी पैसे घेतले जेव्हा आई-बाबा शॉपिंग करून बाहेर आले तेव्हा मी त्यांना म्हटलं हे बघा मला पैसे मिळाले. त्यावर ती म्हणाली पैसे मिळाले नाही त्यांनी तुला भिकारी समजून पैसे दिले.' साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा काही काळापूर्वी रिलीज झालेला 'लव्ह आज कल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. याशिवाय ती लवकरच वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1' च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. तसेच अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत 'अतरंगी रे' या सिनेमातही ती मुख्य भूमिकेत आहे.

अक्षय कुमार लॉकडाऊनमध्ये करतोय आगामी सिनेमाची तयारी, असं सुरू आहे काम

राम गोपाल वर्मानं COVID-19 वर तयार केला पहिला सिनेमा, पाहा Coronavirus Trailer

First published: May 27, 2020, 3:35 PM IST

ताज्या बातम्या