मुंबई, 12 नोव्हेंबर : मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या रानू मंडल काही दिवसांपूर्वी एका चाहतीवर रागावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांना मीडियालाही टाळटाळ करत प्रतिक्रिया दिल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यांच्या या वागण्यामुळे सर्वांनी त्यांच्यावर टीका केली होती. याशिवाय त्यांच्या या वागण्यावर अनेक मीम्स सुद्धा सोशल मीडियावर मागच्या काही काळापासून व्हायरल होत आहेत. पण या सगळ्यात रानू मंडल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया फिरत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला रानू मंडल यांचा हा व्हिडीओ त्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या अगोदरचा आहे. या व्हिडीओमध्ये त्या सलमान खानचा सिनेमा 'चोरी चोरी चुपके चुपके'मधील ‘दिल तेरा मेरा दिल’ हे गाणं गाताना दिसत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून याला युजर्स कडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर काहींनी मात्र रानू मंडल पुन्हा त्यांच्या मूळ परिस्थिती आल्या असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे.
सिनेमाच्या सेटवर प्रँक करण्यासाठी प्रसिद्ध आहेत 'हे' बॉलिवूड कलाकार!
रानू मंडल बॉलिवूड डेब्यू करण्याआधी पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपलं पोट भरत असत. त्यावेळी एतींद्र चक्रवर्ती नावाच्या एका मुलानं त्यांचा व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड केला आणि रानू सोशल मीडिया स्टार झाल्या. त्यांनी लता मंगेशकर यांचं गायलेलं गाणं प्रचंड व्हायरल झालं आणि बॉलिवूड सिंगर हिमेश रेशमियानं आपल्या सिनेमासाठी गाणं गाण्याची संधी दिली. यानंतर त्यांनी या सिनेमासाठी एक नाही तर तीन-तीन गाणी गायली.
'या' कारणासाठी सलमान खान मध्यरात्री जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी!
बोल्ड नोरा फतेहीचं Sexy फोटो सेशन; चाहते म्हणाले Hotty...!
====================================================================
SPECIAL REPORT: सत्ता स्थापनेवरुन नेटिझन्सनी शिवसेनेला केलं ट्रोल; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा