'त्या' बोल्ड वक्तव्यावर नेहा धुपियाचं लांबलचक पोस्ट लिहून स्पष्टीकरण, म्हणाली...

'त्या' बोल्ड वक्तव्यावर नेहा धुपियाचं लांबलचक पोस्ट लिहून स्पष्टीकरण, म्हणाली...

नेहा धुपियाने रोडीजमधील एका स्पर्धकाच्या ऑडिशनदरम्यान अत्यंत बिनधास्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर अनेकांनी तिला फेक फेमिनिस्ट अशी उपाधी दिली होती. त्याचप्रमाणे खूप वाईट पद्धतीने तिला ट्रोल केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोरोना व्हायरस (Corornavirus) आणि नेहा धुपियाचं (Neha Dhupia) रोडीज (Roadies) मधील वक्तव्य या दोन्ही बाबींवरच अनेक मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली आहे. नेहा सध्या 'रोडीज रेव्हेल्यूशन'मध्ये टीम लीडर आहे. या शोमध्ये नेहानं एका कंटेस्टंटवर अशी काही कमेंट केली की त्यामुळे आता तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल तर केलं गेलच पण आता तिला या घटनेबाबत स्पष्टीकरणही द्यावं लागलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तिला फेक फेमिनिस्ट अशी उपाधी दिली होती. त्याचप्रमाणे खूप वाईट पद्धतीने तिला ट्रोल केलं होतं.

नेहा धुपिया सध्या 'रोडीज रेव्हेल्यूशन'मध्ये टीम लीडर म्हणून दिसत आहे. या शोची ऑडिशन सुरू असून यामध्ये एका मुलानं सांगितलं की, त्याची गर्लफ्रेंड एकावेळी 5 मुलांना डेट करत होती आणि त्याच्याबरोबर रिलेशनशीपमध्ये चीट करत होती. त्यामुळे त्याने तिच्या कानााखाली वाजवली. या मुलाचं संपूर्ण बोलणं नेहाने ऐकून घेतलं खरं, पण त्यानंतर तिने त्याला खूप बोल सुनावले. 'पाच किंवा त्याहून जास्त मुलांना डेट करणं हा त्या मुलीचा स्वतःचा निर्णय असू शकतो. त्यासाठी तिच्या कानाखाली मारण्याचा तुला काहीही अधिकार नाही.' अशा शब्दात नेहानं त्या मुलाला सुनावलं.

यावेळी तिने काही आक्षेपार्ह भाषा सुद्धा वापरली होती. त्यामुळे तिचं हे वक्तव्य तिलाच भारी पडलं आहे.

नेहाने आपल्या ट्विटर अकाउंटवर याबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. ती म्हणाली की, ‘मी गेल्या 5 वर्षांपासून ‘रोडीज’चा हिस्सा आहे. मी या शोमध्ये हिंसेविरोधात आवाज उठवला आहे, मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून माझ्या बाबतीत जे घडलं आहे ते चुकीचं आहे. मी हिंसेविरोधात आवाज उचलला पण दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की, मला कुणी समजून घेतलं नाही. एका मुलाने सांगितलं की त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्याबरोबर चीट केलं म्हणून त्याने तिला थप्पड लगावली. ही बाब मला चुकीची वाटली. म्हणूनच मी त्याला खडसावलं.’

(संबधित-‘5 मुलांना डेट करणं हा तिचा स्वतःचा निर्णय’, बिनधास्त वक्तव्यामुळे फसली नेहा)

नेहा पुढे म्हणाली की, ‘प्रत्येक माणसाची आपली आपली एक चॉइस असते आणि स्वत:च्या पसंतीनुसार वागण्याचा ज्याला-त्याला अधिकार आहे. कोणाला मारहाण करणं चुकीचं आहे. या घटनेनंतर केवळ माझ्याच नाही तर माझ्या मित्रपरिवारला वाईट प्रतिक्रियांनी हैराण केलं गेलं आहे. माझ्या वडिलांना देखील व्हॉट्सअपवर शिव्या पाठवण्यात येत आहेत. माझ्या मुलीच्या फेसबुक वॉलवर अनेकांनी शिव्या पाठवल्या आहेत आणि हे मला अजिबात मंजूर नाही आहे.’  अशाप्रकारे लांबलचक पोस्ट लिहित नेहाने आपली बाजू मांडली आहे. नेहाने वेळोवेळी या स्पष्टीकरणामध्ये लिहिलं आहे की घरगुती हिंसा आणि एकंदरितच हिंसेच्या विरोधात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2020 08:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading