TikTok मुळे 3 ते 4 लाखांची कमाई करणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ, 'या' युजरच्या डान्सचे तर बिग बी देखील फॅन

TikTok मुळे 3 ते 4 लाखांची कमाई करणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ, 'या' युजरच्या डान्सचे तर बिग बी देखील फॅन

लडाखमध्ये चीन (China) आणि भारतीय (India) सैन्यामध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत सरकारने 59 चिनी Apps वर बंदी आणली आहे. त्यामध्ये हेलो, टिकटॉक (Helo and TikTok) सारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे.

  • Share this:

मुंबई, 01 जुलै : लडाखमध्ये चीन (China) आणि भारतीय (India) सैन्यामध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत सरकारने 59 चिनी Apps वर बंदी आणली आहे. त्यामध्ये हेलो, टिकटॉक (Helo and TikTok) सारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे. या अ‍ॅप्सवर अनेक सेलिब्रेटी तसेच सामान्य लोकं देखील आहेत. अनेकांची कमाई या अ‍ॅपच्या माध्यमातून होत असे. अनेकजण टिकटॉकच्या माध्यमातून स्टार बनले आहेत. केवळ नावच नाही तर लाखोंची कमाई अनेकांनी यातून केली आहे. सरकारने हे Apps बॅन केल्यानंतर हे सर्वजण बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या या टॅलेंटमुळे प्रसिद्ध झालेल्या अनेकांनी अशी मागणी केली आहे की, त्यांना टिकटॉकसारखेच इतर कोणते प्लॅटफॉर्म मिळावे ज्यावर त्यांना त्यांची कला दाखवता येईल.

टिकटॉक बॅन झाल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेकजण सरकारच्या निर्णयाबरोबर आहेत मात्र यामुळे ते नाराज देखील आहेत. टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्सनाच नाही तर काही सामान्य माणसांना देखील टिकटॉकने प्रसिद्ध केले होते. दैनिक भास्करने अशा काही लोकांशी बातचीत केली आहे. सन्नी कालरा या टिकटॉकरने गेल्या 2 वर्षांपासून टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्यास सुरूवात केली होती. 12 मिलियन फॉलोअर्स असणारा सन्नी दर महिन्याला टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून 3 ते 4 लाख रुपये कमावत असे. टिकटॉक बॅन झाल्यामुळे त्याने यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर जास्त मेहनत घेणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.

(हे वाचा-'... तर मी आत्महत्या करेन', अभिनेत्रीच्या फेसबुक पोस्टमुळे मनोरंजन विश्वात खळबळ)

जोधपूरचा युवराज सिंह परिहार देखील एका रात्रीत प्रसिद्ध झाला होता कारण त्याचा व्हिडीओ बिग बी अमिताभ बच्चन यांनी शेअर केला होता. टिकटॉकमुळे त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली होती. गेल्यावर्षी टिकटॉकवर आलेल्या युवराजचे 6 मिलियनहून जास्त फॉलोअर्स आहेत. मात्र एवढे फॉलोअर्स असून देखील त्याने यातून कोणती कमाई केली नाही कारण त्याला याबाबत कल्पना नव्हती की टिकटॉकच्या माध्यमातून कमाई कशी केली जाते, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. त्याने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'टॅलेंट कुणी दडपू शकत नाही. टिकटॉक नसेल तर आम्ही दुसऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आमचे टॅलेंट दाखवू.'

(हे वाचा-Cyber Alert! फ्री वेबसाइटवर 'हे' सिनेमा किंवा वेबसीरिज पाहणं पडेल महागात)

अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सरव्हायवर आणि टिकटॉकवर प्रसिद्धीस आलेल्या लक्ष्मी अग्रवालने अशी प्रतिक्रिया दिली की, 'जेव्हा मी टिकटॉकवर सक्रीय झाले तेव्हा दिसले की इथे अनेक लोक आहेत, जे आयुष्याला कंटाळले आहेत. तेव्हा मी लोकांना प्रोत्साहित करण्याचे ठरवले. माझ्या पोस्टमुळे अनेकांना आनंद होत असे.' लक्ष्मीचे टिकटॉकवर अडीच मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सरकारच्या निर्णयामुळे आपण नाराज नाही पण सरकारने लोकांना त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी कोणते तरी App आणणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया लक्ष्मीने दिली आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: July 1, 2020, 8:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading