...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक

...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक

पाकिस्तान सरकारच्या एका निर्णयावर सायरा बानोंनी त्यांचं कौतुक केलं आहे

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : पाकिस्तानच्या खॅबर पख्तूनख्वा सरकारने बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राज कपूर (Raj Kapoor) आणि दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची वडिलोपार्जित घरं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही अभिनेत्यांची वडिलोपार्जित घरं पाकिस्तानातील पेशावरमधील ख्वानी बाजारात आहे.

या घरांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. याचं विपन्नावस्थेत जाण्यापासून वाचविण्यासाठी पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान सरकारच्या या निर्णयानंतर दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो (Saira Banu) यांनी आनंद व्यक्त केला असून पाक सरकारच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.

हे ही वाचा-'बाबा लवकर घरी या...',आजारी वडिलांसाठी अंकिता लोखंडेची भावनिक पोस्ट

सायरा बानो म्हणाल्या...

सायरा बानो या म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातील या वडिलोपार्जित बंगल्यात गेले होते. टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सायरा बानो म्हणाल्या की, जेव्हा कधी पाकिस्तान सरकार ही दिलीप साहेबांच्या वडिलोपर्जित बंगल्याचं रुपांतर मॉन्यूमेंटमध्ये करण्याचा विचार करते तेव्हा मला अत्यानंद होतो. मी नेहमीच पाक सरकारच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. आशा आहे की यंदा ते स्वप्न पूर्ण होईल. बानो पुढे म्हणाल्या की, या वडिलोपार्जित बंगल्यात त्यांचे पती दिलीप कुमार यांच्या सुखद आठवणी आहेत. ज्या अत्यंत अमूल्य आहेत. जेव्हा दिलीप साहेब शेवटी तेथे गेले होते तेव्हा फार भावनिक झाले होते.

Published by: Meenal Gangurde
First published: September 28, 2020, 10:07 PM IST

ताज्या बातम्या