...म्हणून ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू एकट्या राहतात, अखेर त्यांनीच व्यक्त केल्या भावना

...म्हणून ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू एकट्या राहतात, अखेर त्यांनीच व्यक्त केल्या भावना

नीतू कपूर मुलगा अभिनेता रणबीर (Ranbir Kapoor)आणि रिद्धिमासोबत (RidhimaKapoor) का राहत नाही, याबाबत पहिल्यांदाच त्यांनी खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूर (Actor Neetu Kapoor) एकट्या राहत आहेत. त्या मुलगा अभिनेता रणबीर (Ranbir Kapoor)आणि रिद्धिमासोबत (RidhimaKapoor) का राहत नाहीए, याबाबत पहिल्यांदाच त्यांनी खुलासा केला आहे. नीतू म्हणाल्या, मला एकांत आवडतो, सतत कुणीतरी सोबत असलं आणि माझ्या प्रायव्हसीत हस्तक्षेप केला तर मला अवघडल्यासारखं होतं. त्यामुळे मी रिद्धिमा आणि रणबीरला म्हणते, की तुम्ही माझ्या हृदयात राहा, डोक्यावर मिरे वाटू नका. म्हणजे मला थोडं एकटं राहू द्या.’याबाबतचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलंय.

ऋषी कपूर यांच्या (Rishi Kapoor) निधनानंतर मुलगी रिद्धिमा नीतू यांच्यासोबत राहत होती. मात्र, नीतू यांना वाटायचं की तिने तिच्या घरी दिल्लीला जावं आणि पती भरत सहानीसोबत राहावं. दोघांनी त्यांच्या आयुष्यात बिझी राहावं, त्यांची कामं करावीत. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये ऋषी कपूर यांचं निधन झाल्यानंतर रिद्धिमा वर्षभर नीतू यांच्यासोबत थांबली होती. यावर नीतू म्हणाल्या, मला ती परत जात नसल्यानं टेन्शन यायचं, काहीच सुचायचं नाही. मी तिला परत जायला सांगायची, मी जवळजवळ तिला घरातून निघून जायला सांगत होते. मला एकटं राहायची सवय असल्याने तिच्या असण्यानं मला अवघडल्यासारखं व्हायचं. मला एकांत आवडतो, असं नीतू यांनी फिल्मफेअरला (Filmfare) दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

हे ही वाचा-अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी

यावेळी नीतू यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, जेव्हा रिद्धिमा शिक्षणासाठी लंडनला गेली होती, तेव्हा मला खूप त्रास झाला होता. रिद्धिमाला कुणी भेटायला यायचं आणि गुडबाय म्हणायचं तरी मी रडायला लागायचे. ती गेल्यानंतर कित्येक दिवस मी रडले होते. मात्र, जेव्हा रणबीर शिक्षणासाठी बाहेर गेला तेव्हा मला काहीच वाटलं नाही. कारण मला सवय झाली होती. रणबीर मला म्हणायचा की तू माझ्यावर प्रेमच करत नाहीस. मात्र, तसं नाही. मला माझ्या मुलांपासून दूर असण्याची सवय झाली होती. मला वाटतं की ते दोघंही शिक्षणासाठी परदेशात गेल्यानंतर मी मनाने जास्त स्ट्राँग झाले आणि एकटं राहायची सवय झाली.

‘ऋषीच्या जाण्यानंतर रिद्धिमा आणि रणबीरने मला वेळ दिला आणि त्या दुःखातून बाहेर पडण्यात मदत केली. मात्र, आता त्या दोघांनीही त्यांच्या आयुष्यात बिझी रहावं आणि खूश राहावं, असं मला वाटतं. त्या दोघांची वैयक्तिक आयुष्य आहेत. त्यामुळे जेव्हा ते मला भेटायला येतात तेव्हा मला आनंद होतो. मात्र, दोघांनीही परत त्यांच्या घरी जावं, माझ्यासोबत थांबू नये, असं मला वाटतं. मला दोघांनीही रोज भेटावं अशी माझी अजिबात इच्छा नसते. मी म्हणते, तुम्ही दोघं माझ्या संपर्कात राहा, तेवढं पुरेसं आहे. मला एकांत आवडतो, मी स्वतंत्र आहे आणि असंच जगायला मला आवडतं,’असंही नीतू यांनी सांगितलं.

नीतू कपूर यांनी नुकतंच‘जुग जुग जियो’(Jug Jugg Jeeyo) चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. हा चित्रपट गूड न्यूज (Good Newwz) फेम राज मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात वरूण धवन (Varun Dhawan),कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) दिसणार आहेत.

First published: May 13, 2021, 10:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या