मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Avishkar Darvekar: 'त्याने मला ठरवून फसवलं'; तिसरं लग्न करताच आविष्कारच्या दुसऱ्या पत्नीचा गंभीर आरोप

Avishkar Darvekar: 'त्याने मला ठरवून फसवलं'; तिसरं लग्न करताच आविष्कारच्या दुसऱ्या पत्नीचा गंभीर आरोप

अभिनेता आविष्कार दारव्हेकरनं दुसरं लग्न केल्याची माहिती त्यानं सोशल मीडियावर दिली मात्र हे त्याचं दुसरं नाही तर तिसरं लग्न असल्याचं समोर आलं आहे.

अभिनेता आविष्कार दारव्हेकरनं दुसरं लग्न केल्याची माहिती त्यानं सोशल मीडियावर दिली मात्र हे त्याचं दुसरं नाही तर तिसरं लग्न असल्याचं समोर आलं आहे.

अभिनेता आविष्कार दारव्हेकरनं दुसरं लग्न केल्याची माहिती त्यानं सोशल मीडियावर दिली मात्र हे त्याचं दुसरं नाही तर तिसरं लग्न असल्याचं समोर आलं आहे.

    मुंबई, 15 ऑगस्ट: प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि बिग बॉस मराठी फेम आविष्कार दारव्हेकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आविष्कारनं पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकला असल्याची माहिती त्यानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली. आविष्कारनं वाढदिवसाच्या फोटो शेअर करत बायकोबरोबरचे फोटो शेअर केले. त्याच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आविष्कारनं दुसरं लग्न केलं असं सर्वांना वाटत होतं मात्र हे आविष्कारचं दुसरं नाही तर तिसरं लग्न असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर त्याच्या दुसऱ्या बायकोनं पोस्ट लिहित गंभीर आरोप केले आहेत. आविष्कारनं ठरवून मला फसवलं आणि आम्हाला 5 वर्षांचा मुलगा असल्याचा खुलासा त्या महिलेनं केला आहे. इतकंच नाही तर महिलेनं दोघांचा लग्नातील फोटो देखील शेअर केला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचा फोटो देखील समोर आला आहे. स्मिता सावंत नावाच्या महिलेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आविष्कारवर गंभीर आरोप केलेत. तिनं म्हटलंय, 'नमस्कार मी अवनी ( स्मिता ) आविष्कारची बायको. आम्हाला 5 वर्षांचा एक मुलगा आहे. आविष्कारनं मला ठरवून पूर्णपणे फसवलं आहे. आमचा घटस्फोट झालेला नसताना त्यानं त्या मुलीशी लग्न केलं आहे. ते मला कळू न देता. त्या मुलीच्या घरचे मला ओळखत होते. मी त्यांच्या घरी देखील जाऊन ले होते. तरी देखील त्या मुलीच्या आणि त्याच्या घरच्यांनी यांचं गुपचूप घरातचं लग्न लावून दिलं आहे.  आविष्कारवर करण्यात आलेल्या या आरोपांनी पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून महिलेच्या पोस्टमुळे एकचं खळबळ उडाली आहे'. हेही वाचा - Aavishkar Darwhekar: स्नेहा वाघच्या एक्स-हसबंडने पुन्हा केलं लग्न; फोटो शेअर करत म्हणाला... ती मुलगी मला मारायला धावून आली इतकंच नाही तर आविष्कारनं त्याच्या दुसऱ्या पत्नीला आर्थिकदृष्ट्या फसवलं असल्याचा आरोप देखील तिनं केला आहे. त्यांनी म्हटलंय, 'याने आणि याच्या घरच्यांनी मला पूर्णपणे आर्शिकदृष्ट्या लुटलं आहे. माझे सगळे दागिने विकले. माझ्यानावावर खूप कर्ज करुन ठेवलेत. माझे माझ्या आई वडिलांचे पैसे हवे तसे वापरले आणि आता त्याच्याकडे पैसे मागितले तर त्यानं मला सांगितलं कोर्टात जाऊन माग त्याच्या घरी गेले तेव्हा मला हाता पाया पडायला लावलं. तरच पैसे देईन म्हणाला. त्या मुलीला विचारलं असता ती मलाच उटल बोलायला लागली मारायला धावून आली'. अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर केलं होतं पहिलं लग्न आविष्कार दारव्हेरचं या आधी अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर लग्न झालं होतं. स्नेहा तेव्हा फक्त 19 वर्षांची होती.  मात्र त्यांचं नाव फार काळ टिकू शकलं नाही. स्नेहानं देखील आविष्कार आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. बिग बॉस मराठी 3मध्ये स्नेहा आणि आविष्कार समोरासमोर आले होते. तेव्हाही आविष्कार त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला होता.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Marathi entertainment

    पुढील बातम्या