Home /News /entertainment /

स्मृती इराणींनी एकता कपूरच्या मुलाच्या वाढदिवशी शेअर केला खास VIDEO, म्हणाल्या...

स्मृती इराणींनी एकता कपूरच्या मुलाच्या वाढदिवशी शेअर केला खास VIDEO, म्हणाल्या...

अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी आणि एकता कपूर (Ekta Kapoor and Amriti Irani) यांची मैत्री जगजाहीर आहे. दोघीही अनेक वेळा सोशल मीडियावर एकमेकांप्रतिचं प्रेम व्यक्त करत असतात.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी आणि एकता कपूर (Ekta Kapoor and Amriti Irani) यांची मैत्री जगजाहीर आहे. दोघीही अनेक वेळा सोशल मीडियावर एकमेकांप्रतिचं प्रेम व्यक्त करत असतात. या दोघींच्या मैत्रीचे किस्से तर नेहमीच ऐकायला मिळतात. या दोघींच्या मैत्रीचा पुन्हा नव्याने उल्लेख करण्याचं कारण म्हणजे स्मृती इराणी यांनी एकता कपूरच्या मुलाविषयी शेअर केलेली एक पोस्ट. नुकताच स्मृती इराणी यांनी एकता कपूरच्या मुलासाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून स्मृती यांनी एकताच्या मुलावरचं (Ekta Kapoor son Ravie Kapoor) आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. या व्हिडिओवर एकता कपूरनेदेखील कमेंट केली आहे. स्मृती इराणी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. फोटोज, व्हिडिओ त्या पोस्ट करत असतात. त्यांचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. एकता कपूरचा मुलगा रवी कपूरचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला असून, या व्हिडिओने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हे ही वाचा-सुख म्हणजे नक्की.. मालिकेत येणार मोठा TWIST; अडाणी गौरी होणार वकील व्हिडिओ शेअर करताना स्मृती यांनी लिहिलं आहे, की 'हा माझ्या बाळाचाच वाढदिवस आहे. रवी, तू सगळं कुटुंब आणि तुझ्या आईसाठी एक आशीर्वाद आहेस. देव, तुला उत्तम आरोग्य आणि आनंद देवो. मावशीला तुझी फार आठवण येतीय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.' या व्हिडिओवर एकता कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. 'हे खूपच गोड असून रवीदेखील आपल्या मावशीवर खूप प्रेम करतो,' असं एकताने म्हटलं आहे. तसंच एकताचा भाऊ तुषार कपूरनेदेखील इमोजीद्वारे व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. छोट्या पडद्यावरची यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून नंतर राजकारणात आलेल्या स्मृती इराणी या आता केंद्रीय मंत्री आहेत; पण आजही त्यांचं छोट्या पडद्याशी आणि एकता कपूरशी असलेलं नातं कायम आहे. एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे स्मृती इराणी यांना विशेष लोकप्रियाता मिळाली. त्यानंतर त्यांनी अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला होता. एकता कपूर सिंगल मदर आहे. सरोगसीच्या माध्यमातून तिच्या मुलाचा जन्म 27 जानेवारी 2019 रोजी झाला होता. एकताचा भाऊ तुषार कपूरही सरोगसीच्या माध्यमातून बाबा झाला आहे.
    एकता कपूरच्या बाळाचं नाव रवी आहे, तर तुषारच्या बाळाचं नाव लक्ष्य आहे. एकता आणि तुषार या बहिण-भावांनी लग्न केलेलं नाही. यांच्याप्रमाणेच सरोगसीद्वारे आई-बाबा बनलेली अनेक कपल बॉलिवूडमध्ये आहेत.
    First published:

    Tags: Ekta kapoor, Friendship, Smriti irani

    पुढील बातम्या