बर्थडे स्पेशल : का येते स्मिता पाटील यांची आजही आठवण ?

बर्थडे स्पेशल : का येते स्मिता पाटील यांची आजही आठवण ?

स्मिता पाटील यांच्या आईने त्यांना नेहमी अधिकारांसाठी लढायला शिकवलं. याचाच प्रभाव कुठेतरी त्यांच्या सिनेमावर पडला. सिनेमासोबत आपल्या सामाजिक जाणीवाही त्यांनी नेहमी जागृत ठेवल्या.

  • Share this:

17 ऑक्टोबर : मोठ्या डोळ्यांची, विलक्षण प्रतिभाशाली अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज 62 वी जयंती आहे. राजकीय वारसा असलेल्या घरात जरी तिचा जन्म झाला तरी तिला आवड मात्र अभिनयाची होती. सगळ्या अभिनेत्रींमध्ये त्या वेगळ्या दिसायच्या, वागायच्याही वेगळ्या आणि त्यामुळे असेल कदाचित त्यांचे सिनेमेही सगळ्यात वेगळे,हटके असायचे.

स्मिता पाटील यांच्या आईने त्यांना नेहमी अधिकारांसाठी लढायला शिकवलं. याचाच प्रभाव कुठेतरी त्यांच्या सिनेमावर पडला. सिनेमासोबत आपल्या सामाजिक जाणीवाही त्यांनी नेहमी जागृत ठेवल्या. पुण्यातल्या खासदार शिवाजीराव पाटील यांच्या घरात जन्मलेल्या स्मिताताई 1970मध्ये पहिल्यांदा दुरदर्शनवर बातम्या वाचताना दिसल्या. याच दरम्यान, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या त्या नजरेस पडल्या. त्यांच्या अभिनयाची आणि त्यांच्या वेगळेपणाची जादु बेनेगल यांच्यावरही पडली आणि त्यांनी स्मिता यांना सिनेमात काम करण्याची संधी दिली.

'अर्थ', 'भूमिका','मंडी' अशा समांतर सिनेमात काम केल्यानंतर स्मिता यांनी व्यावसायिक सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. राज खोसला यांच्या 'नमक हलाल' या सिनेमात त्यांचं अमिताभ बच्चन सोबतचं 'आज रपट जाएं तो' हे लोकप्रिय गाणं अजूनही कोणी विसरलेलं नाही.

राज बब्बर यांच्या येण्यानं त्यांच आयुष्यच बदललं. स्मिता यांच्या 'अदां'वर राज बब्बर विवाहित असूनही 'फिदा' झाले. स्मिता पाटीलही त्यांच्या प्रेमात अवघ्या बुडाल्या होत्या.

राज यांनी स्मिता यांच्या प्रेमासाठी त्यांची पत्नी नादिरा बब्बर यांना घटस्फोट दिला. स्मिता आणि राज यांच लग्न हे त्यांच्या चाहत्यांसाठी आणि मीडियासाठी धक्कादायक बाब होती. याच निर्णयामुळे, स्मिता आणि राज यांना त्यांच्या चाहत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं.

पण तरीही त्यांच्या दर्जेदार अभिनयाने आणि प्रभावशाली व्यक्तीमत्त्वामुळे त्या आजही त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2017 05:24 PM IST

ताज्या बातम्या