मराठमोळ्या स्मिता पाटील यांनी बदलला बॉलिवूड सिनेमांचा चेहरा!

स्मिता यांनी वयाच्या 31 व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या छोट्याशा सिने करिअरमध्ये त्यांनी 50 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आणि 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा जिंकला.

  • Share this:

टपोरे डोळे, सावळा वर्ण, एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्माला आलेली मुलगी पण प्रेम जडलं ते अभिनयावर. त्या काळाच्या अभिनेत्रीपेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या दिसणाऱ्या आणि वेगळी स्वप्न घेऊन आलेल्या स्मिता पाटील यांची आज पुण्यतिथी...

तीन बहिणींमध्ये मधल्या स्मिता यांना त्यांच्या आईनं नेहमीच स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिकवलं. त्यामुळे कदाचित त्याचाच प्रभाव स्मितांच्या सिनेमांवरही दिसून आला.

पुण्याच्या शिवाजी पाटील यांच्या घरात जन्मलेल्या स्मिता 1970 च्या दशकात पहिल्यांदा दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून दिसल्या.

याच काळात त्या दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या नजरेत भरल्या आणि त्यांच्या पुढच्या सिनेमाची अभिनेत्री म्हणून स्मिता यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.

'अर्थ', 'भूमिका', 'मंडी' सारख्या एकसारख्या धाटणीच्या सिनेमात काम केल्यानंतर स्मिता यांनी कमर्शिअल सिनेमात आपलं नशीब आजमावायचं ठरवलं. राज खोसलाचा सिनेमा 'नमक हलाल' मधील अमिताभ बच्चनसोबतचा त्यांचा 'आज रपट जाएं' गाण्यावरील डान्स लोक आजही विसरु शकलेले नाहीत.

दरम्यान राज बब्बर यांच्या एंट्रीनं स्मिता पाटील यांच्या जीवनात मोठा बदल झाला. स्मिता यांच्या सौंदर्याची जादूच अशी होती की, विवाहित असलेले राज बब्बर त्यांच्या प्रेमात पडले. तोपर्यंत स्मिता सुद्धा त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या.

राज यांनी स्मितांसाठी पत्नी नादिया बब्बर यांना घटस्फोट दिला. या दोघांचं लग्न हे त्यांच्या चाहत्यांसाठी आणि मीडियासाठी खूप मोठा झटका होता. ज्यामुळे स्मिता आणि राज यांना बरीच टीका सहन करावी लागली.

राज बब्बर यांच्याशी लग्नानंतर प्रतीकचा जन्म झाला. पण त्याच्या जन्माच्या वेळी काही समस्या आल्या ज्यामुळे राजच्या जन्मानंतर अवघ्या 10 दिवसातच स्मिता यांनी वयाच्या 31 व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या छोट्याशा सिने करिअरमध्ये त्यांनी 50 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आणि 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा जिंकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 08:56 AM IST

ताज्या बातम्या