मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'ही'अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; स्वतःचं चाहत्यांना दिली गुडन्यूज

'ही'अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; स्वतःचं चाहत्यांना दिली गुडन्यूज

 ‘स्लमडॉग मिलेनियर’ (Slumdog Millionaire) या चित्रपटामुळे अभिनेत्री फ्रिडा पिंटो  प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

‘स्लमडॉग मिलेनियर’ (Slumdog Millionaire) या चित्रपटामुळे अभिनेत्री फ्रिडा पिंटो प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

‘स्लमडॉग मिलेनियर’ (Slumdog Millionaire) या चित्रपटामुळे अभिनेत्री फ्रिडा पिंटो प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 29 जून- ‘स्लमडॉग मिलेनियर’ (Slumdog Millionaire) या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री फ्रिडा पिंटोने (Freida Pinto) नुकताच चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेयर केली आहे. फ्रिडा लवकरच आई बनणार आहे. फ्रिडाने सोशल मीडियावरून ही माहिती आपल्या चाहत्यांसाठी शेयर केली आहे. त्यामुळे तिच्यावर अभिनंनदनाचा वर्षाव होतं आहे.

फ्रिडा पिंटोने नुकताच आपल्या सोशल मीडियावर आपला आणि होणारा पती कॉरी ट्रॅनचा फोटो शेयर करत सर्वांना आपण आई होणार असल्याची गुड न्यूज दिली आहे. हे बातमी ऐकताच तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरून फ्रिडावर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे. फ्रिडाने कॉरीसोबत फोटो पोस्ट करत लहान बेबी ट्रॅन येणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांनी अजूनही लग्न केलेलं नाहीय. लग्नाआधीच अभिनेत्रीनं ही गुडन्यूज दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Freida Pinto (@freidapinto)

फ्रिडाने 2019 मध्ये कॉरी ट्रॅनसोबत साखरपुडा केला होता. तिने स्वतः फोटो शेयर करत ही माहिती चाहत्यांना दिली होती. कॉरी हा विदेशी असून तो एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. फ्रिडा आणि कॉरी बऱ्याच काळापासून एकेमकांना डेट करत होते. अखेर 2019 मध्ये त्यांनी आपला साखरपुडा उरकून घेतला आहे.

(हे वाचा: HBD: खलनायिका कशी झाली विनोदी अभिनेत्री? पाहा उपासनाचा अनोखा प्रवास  )

याआधी फ्रिडा अभिनेता देव पटेल आणि रॉनी बकार्डीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर फ्रिडाने कॉरीला डेट केलं होतं आणि त्याचाय्शी साखरपुडा देखील केला आहे. आणि आत्ता हे दोघेही आई बाबा होणार असल्याची गोड बातमी समोर आली आहे.

(हे वाचा: बिग बॉस’मध्ये झळकणार का? नेटकऱ्यांच्या चर्चेवर अखेर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन)

फ्रिडा पिंटो ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटामधून प्रसिद्धीच्या झोतात आली होई. या चित्रपटाला अनेक ऑस्कर मिळाले आहेत. याचं चित्रपटातील सह कलाकार देव पटेलसोबत फ्रिडा रिलेशनशिपमध्ये होती. तब्बल सहा वर्षे एकेमेकांना डेट केल्यानंतर हे दोघे विभक्त झाले होते.

First published:

Tags: Actress, Bollywood actress, Entertainment, Pregnant