मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Slim Trim करिना कपूरला आवडतं तूप, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येक जेवणात करते वापर

Slim Trim करिना कपूरला आवडतं तूप, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येक जेवणात करते वापर

Kareena Kapoor Diet: करिनाच्या  फिटनेसचं रहस्य काय याची उत्सुकता नेहमीच सर्वांना असते. पण करिनाला तूप (Butter-Ghee) खूप आवडतं आणि ती प्रत्येक जेवणात भरपूर तूप खा?

Kareena Kapoor Diet: करिनाच्या फिटनेसचं रहस्य काय याची उत्सुकता नेहमीच सर्वांना असते. पण करिनाला तूप (Butter-Ghee) खूप आवडतं आणि ती प्रत्येक जेवणात भरपूर तूप खा?

Kareena Kapoor Diet: करिनाच्या फिटनेसचं रहस्य काय याची उत्सुकता नेहमीच सर्वांना असते. पण करिनाला तूप (Butter-Ghee) खूप आवडतं आणि ती प्रत्येक जेवणात भरपूर तूप खा?

मुंबई, 30 जुलै:  बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आपल्या फिटनेससाठी (Fitness) प्रसिद्ध आहे. झिरो फिगर (Zero figure) ही संकल्पना तिच्यामुळेच लोकप्रिय झाली. आजही दुसऱ्या मुलाच्या गरोदरपणानंतर तिनं फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे. फिटनेसच्या बाबतीत तिचा हात कोणीही धरू शकत नाही. करिनाच्या या फिटनेसचं रहस्य काय याची उत्सुकता नेहमीच सर्वांना असते. पण करिनाला तूप (Butter-Ghee) खूप आवडतं आणि प्रत्येक जेवणात ती भरपूर तूप खाते असं सांगितलं तर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र हे अगदी खरं आहे. करिनाला तूप खूप आवडतं त्यामुळे ती आपल्या आहारात आवर्जून तुपाचा समावेश करते. गरोदरपणातही ती तूप खात असे. आपल्या फिटनेसचं रहस्य सांगताना, दररोज किमान एक चमचा साजूक तूप खाणं आवश्यक आहे, असं करिना म्हणते. एबीपी लाईव्ह डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

काही वर्षांपूर्वी करिनानं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे आपला आहार आणि व्यायाम करून झिरो फिगर मिळवली होती. आजही ती त्याच पद्धतीचा वापर करून आपला फिटनेस राखत आहे. स्लिम-ट्रिम राहण्यासाठी अभिनेत्री खूपच कठीण डाएट करतात. तेलकट पदार्थ, गोड खात नाहीत. तूप तर वर्ज्यच असते. अशावेळी झिरो फिगर राखणारी करिना मात्र प्रत्येक जेवणात तूप खाते म्हटल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटतं; पण तूपामुळे शरीर तंदुरुस्त राहतंच पण त्वचाही चमकदार राहते. करिना देखील याला दुजोरा देते. आपल्या चमकदार त्वचेचं (Glowing Skin) रहस्य तूप खाण्यात असल्याचं ती सांगते.

अर्थात आहाराबरोबर ती व्यायामालाही(Workout) महत्त्व देते. करिना नेहमी योगासने(Yoga)आणि इतर व्यायाम करते. गरोदरपणातही तिनं योग्य व्यायाम करण्याला प्राधान्य दिलं होतं. त्यामुळेच आहारात भरपूर तूप खाऊनही करिना आपली फिगर स्लिम ठेवण्यात यशस्वी होते. चार वर्षांपूर्वी तिचा आणि सैफचा पहिला मुलगा तैमुर याच्या जन्मानंतरही लगेच तिनं आपलं गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करत पुन्हा स्लिम-ट्रीम फिगर मिळवली होती. आताही दुसरा मुलगा जेह याच्या जन्मानंतरही तिनं आपलं वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित केलं आहे. अनेकदा ती आपल्या व्यायामाचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

करिना लवकरच आमीर खानच्या (Aamir khan) लालसिंग चढ्ढा (Lalsingh Chadhdha) या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग लडाखमध्ये सुरू आहे. त्यामुळं लवकरच प्रेक्षकांना स्लिम ट्रीम करीनाचं मोठ्या पडद्यावर दर्शन होईल.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Kareena Kapoor