ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर

गायक सुरेश वाडकर यांना यंदाचा देशातील अत्यंत मानाचा मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर ज्यांच्या सुरांनी अधिराज्य गाजवलं ते ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना यंदाचा देशातील अत्यंत मानाचा मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आधी केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. यानिमित्तानं त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

हिंदी, मराठी, भोजपुरी, कोकणी, ओडिया अशा अनेक भाषांमध्ये त्यांची गाणी लोकप्रय आहेत. त्यांची फिल्मी आणि नॉन फिल्मी गाणी अजरामर आहेतच. पण यासोबतच त्यांच्या म्युझिक स्कूल द्वारे त्यांनी अनेकांना संगीताचं प्रशिक्षण दिलं आहे. आजीवासन म्युझिक अॅकॅडमी असं त्यांच्या म्युझिक स्कुलचं नाव असून यातून हिंदुस्थानी शास्रीय संगीताचं प्रशिक्षण दिलं जातं. याशिवाय अनेक ऑनलाइन कोर्स सुद्धा उपलब्ध आहेत.

नसीरुद्दीन शाहांच्या मुलगीच्या विरोधात FIR दाखल, समोर आलं धक्कादायक कारण

सुरेश वाडेकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 रोजी कोल्हापुरात झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी गुरु पंडित जियालाल वसंत यांच्याकडून संगीताचं शिक्षण सुरु केलं. 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरेश वाडकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव केला होता. तर 2011 मध्ये सुरेश वाडकरांना ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मध्य प्रदेश सरकारने त्यांना प्रतिष्ठित ‘लता मंगेशकर पुरस्कारा’नंही गौवरवण्यात आलं होतं.

साराला या सिनेमात संधी द्यायचीच नव्हती, सैफ अली खानचा धक्कादायक खुलासा

देर ना हो जाये कही, छोड आये हम वो गलिया..., लगी आज सावन की, ऐ जिंदगी गले लगा ले, हुजूर इस कदर भी ना, मोहोब्बत है क्या चीज, तुमसे मिलके– परिंदा, ओ रब्बा कोई तो बताये, ओ प्रिया प्रिया ही हिंदी गाणी तसेच ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे ही त्यांची गाणी अजरामर आहे याशिवाय गायत्री मंत्र, अनेक भक्ती गीतं सुद्धा त्यांनी गायली आहेत.

सेजल शर्मा आत्महत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट, मित्रानं केला मोठा गौप्यस्फोट

First published: January 25, 2020, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading