'माझ्या मुलाने भारतामध्ये गायक होऊ नये' सोनू निगमच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळणार?

'माझ्या मुलाने भारतामध्ये गायक होऊ नये' सोनू निगमच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळणार?

सोनू निगम (Sonu Nigam) म्हणतो, 'माझ्या मुलाने गायक होऊ नये अशी माझी इच्छा आहे. आणि झालाच तर भारतात गायकी करू नये असं मला वाटतं.'

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) त्याच्या गाण्याप्रमाणेच वेगवेगळ्या वक्तव्यांमुळेही प्रसिद्ध आहे. कधी बॉलिवूडमधील घराणेशाही बद्दल, कधी राजकारणाबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. यामुळे त्याने वादही ओढवून घेतले आहेत. सोनूने पुन्हा एकदा असंच एक वक्तव्य केलं आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनू म्हणाला, ‘माझ्या मुलाला गायक व्हायचं नाही. आणि त्याला गायक व्हावसं वाटलं तरी भारतात होऊ देणार नाही.’

सोनू निगमच्या गाण्याचा अल्बम लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या अल्बममधलं 'ईश्वर का वो सच्चा बंदा' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्यानिमित्त त्याची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी सोनू निगमला प्रश्न विचारण्यात आला की, ‘तुझ्या मुलाला गायक होण्याची इच्छा आहे का? त्यावर सोनूने उत्तर दिलं, नाही त्याला गायक होण्याची इच्छा नाही. आणि त्याला गायक व्हावसं वाटलं तरी त्याने भारतामध्ये गायक होऊ नये अशी माझी इच्छा आहे.’

मुलाखतीमध्ये सोनू पुढे म्हणाला, ’माझा मुलगा सध्या दुबईमध्ये आहे. तो उत्तम गातो. पण त्याला गायक होण्याची इच्छा नाही. त्याला गेमिंगमध्ये खूप रस आहे. मला असं वाटतं की त्याने स्वत:चं करिअर निवडलं आहे.’ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता या व्हिडीओमध्ये त्याने बॉलिवूडमधल्या नेपोटिझमवर बोट ठेवलं होतं. अभिनय क्षेत्रासोबतच संगीतामध्येही घराणेशाही वाढत आहे असा आरोप त्याने केला होता. नेपोटिझममुळे नव्या कलाकारांना संधी मिळत नाही असं तो म्हणाला होता.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 16, 2020, 9:05 PM IST

ताज्या बातम्या