मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ठरलं तर! 'हे' असणार बाळाचं नाव, श्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा

ठरलं तर! 'हे' असणार बाळाचं नाव, श्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा

 गायिका (Singer) श्रेया घोषालने(Shreya Ghoshal) 22 मेला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

गायिका (Singer) श्रेया घोषालने(Shreya Ghoshal) 22 मेला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

गायिका (Singer) श्रेया घोषालने(Shreya Ghoshal) 22 मेला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

  मुंबई, 2 जून- गायिका (Singer) श्रेया घोषालने(Shreya Ghoshal) 22 मेला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. श्रेया गर्भवती असल्याची बातमी समजल्यानंतरचं चाहत्यांना खूप उत्सुकता लागून होती. अखेर श्रेयाला पुत्ररत्न  झाल्याची माहिती तिने सोशल मीडियावरून शेअर केली होती. तर आज श्रेयाने पोस्ट करत आपल्या मुलाचं नाव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. पाहूया श्रेयाने आपल्या मुलाला काय नाव दिलं आहे.
  श्रेयाने सोशल मीडियावर पती आणि मुलासोबत फोटो शेअर करत, आपल्या मुलाचं नाव देवयान ठेवल्याच सांगितलं आहे. श्रेयाने पोस्ट करत लिहिलं आहे, ‘देवयान मुखोपाध्यायची ओळख करून देत आहे. 22 मेला तो आमच्या आयुष्यात आला. आणि आमचं संपूर्ण जगच बदलून गेलं. फक्त आई वडीलचं आपल्या मुलाचा सहवास समजू शकतात. कधीही न संपणारं प्रेम या नात्यात असतं आणि हे सर्व माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे’. असं म्हणत श्रेयाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (हे वाचा:HBD: तेजश्री प्रधान आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला  ) श्रेयाने गर्भवती असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. तेव्हापासून तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतं होता. या काळात श्रेया सतत आपले फोटो शेयर करून चाहत्यांना अपडेट देत होती. श्रेयाचं बेबीशॉवरसुद्धा खुपचं अनोख झालं होतं. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे लॉकडाऊन आहे. तसेच कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे श्रेयाने आपलं बेबी शॉवर ऑनलाईन पद्धतीने केलं होतं आणि ते फोटोसुद्धा चाहत्यांसाठी शेअर केले होते. (हे वाचा: HBD: अशी मिळाली होती श्रीकृष्णची भूमिका, वाचा नितीश भारद्वाज यांचा अनोखा किस्सा ) 2015 मध्ये श्रेयाने आपला बालपणीचा मित्र शिलादित्यशी लग्न केल होतं. तो एका सोशल वेबसाईटचा संस्थापक आहे. या दोघांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याने यांचे कुटुंबीय खूपच आनंदी असल्याचं श्रेयाने म्हटलं होतं. यांच्या घरात देवयानच्या रुपात आनंद आला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Playback singer

  पुढील बातम्या