मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘रिम झिम गिरे सावन’; शंकर महादेवन आणि मुलगा शिवम यांचा पहिल्या पावसाचा आनंद, पाहा VIDEO

‘रिम झिम गिरे सावन’; शंकर महादेवन आणि मुलगा शिवम यांचा पहिल्या पावसाचा आनंद, पाहा VIDEO

गायक शंकर महादेवन यांनी मुलासोबत गाणं गाऊन मनसोक्त पावसाचा आनंद घेतला.

गायक शंकर महादेवन यांनी मुलासोबत गाणं गाऊन मनसोक्त पावसाचा आनंद घेतला.

गायक शंकर महादेवन यांनी मुलासोबत गाणं गाऊन मनसोक्त पावसाचा आनंद घेतला.

  • Published by:  News Digital

मुंबई 9 जून: पहिला पाऊस सुरू झाला की रसिक मन असणाऱ्या प्रत्येकाला पावसाची गाणी गाण्याचा, कविता करण्याचा मोह होतो. नुकताच पहिला पाऊस राज्यात येऊन पोहोचला आहे. आणि मुसळधार सरी बरसत देखील आहे. अशातच मराठी तसेच बॉलिवूडचे लोकप्रिय गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी त्यांच्या गोड आवजाने पहिल्या पावसाचं स्वागत केलं आहे.

मुलगा शिवम महादेवन (Shivam Mahadevan) सोबत बापलेकांचा मधुर आवाज श्रोत्यांना ऐकायला मिळाला. तेही पावसाच्याच गाण्यावर. ‘रिम झिम गिरे सावन’ (Rim Jhim Gire Sawan) या लोकप्रिय जुन्या गाण्यावर त्यांनी काही ओळी गायल्या. शिवम हा देखील गायक आहे. व वडीलांप्रमाणेच तो ही मधूर गातो. (Shankar Mahadevan music video)

या दोघांचा हा व्हिडीओ श्रोत्यांना देखील फारच आवडला असून अनेकांनी त्यांना कमेंट्सही दिल्या आहेत. 1979 साली आलेल्या ‘मंजील’ (Manjil) या चित्रपटातील हे गाण आजही अनेकांच्या ओठी गुणगुणताना पाहायला मिळतं. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आपल्या गोड गळ्यातून हे गाणं स्वरबद्ध केलं होतं. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आणि मौशमी चॅटर्जी (Moushami Chatterji) यांनी या चित्रपटात अभिनय केला होता.

मराठी, हिंदीनंतर आता साऊथच्या पडद्यावरही झळकली पल्लवी; पाहा अभिनेत्री सध्या काय करतेय

आजवर अनेक गाण्यांमंधून शंकर महादेवन यांनी श्रोत्यांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच गाणं ऐकणं म्हणजे एक पर्वणीच ठरते.

सोशल मीडियावर ते   नेहमीच लहान लहान क्लिप्स शेअर करत असतात. ‘सुर निरागस हो’ (Sur Niragas Ho), ‘एकदंताय वक्रतुंडाय’ ही त्यांची मराठीतील गाणी तुफान लोकप्रिय ठरली होती. याशिवाय त्यांचा लहान मुलगा शिवम महादेवन हा देखील त्याचे काही गायणाचे व्हिडीओ पोस्ट करत असतो.

First published:

Tags: Entertainment, Singer