Home /News /entertainment /

अखेर खुलासा झालाच!! नेहा कक्कर 'याच्या'सोबत चढणार बोहल्यावर

अखेर खुलासा झालाच!! नेहा कक्कर 'याच्या'सोबत चढणार बोहल्यावर

गायिक नेहा कक्कर आदित्य नारायण यांच्याशी लग्न करणार या चर्चांना उधाण आलं होतं. पण ती अफवाच ठरली. आता नेहा कक्कर बोहल्यावर चढणार असल्याची पक्की खबर आली आहे, थेट तिच्या होणाऱ्या पतीकडून.

    मुंबई, 06 ऑक्टोबर: गायक आदित्य नारायण(Aditya Narayan)सोबत लग्नाच्या चर्चांमुळे नेहा कक्कर सध्या चर्चेत आली आहे. पण नेहा कक्कर पंजाबी सिंगर रोहनप्रित सिंह (Rohnpreet Singh) सोबत ती लग्न करणार असल्याची माहिती आहे. 24 ऑक्टोबर रोजीच तिचं लग्न होणार होतं. पण कोरोनामुळे तिचं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. नेहाच्या लग्नाच्या चर्चा ऐकल्यानंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता हिमांश कोहली (Himansh Kohli) ने त्यावर आपलं मत मांडलं आहे. “नेहा लग्न करणार आहे हे ऐकून मला आनंद झाला, ती तिच्या आयुष्यात मूव्ह ऑन करत आहे हे पाहून बरं वाटलं असंही तो म्हणाला.” हिमांश कोहलीला जेव्हा नेहाच्या आणि रोहनप्रीतच्या लव्हस्टोरीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो त्यांच्याबद्दल काहीच माहित नसल्याचं म्हणाला. दोन माणसं जेव्हा काही काळ एकत्र येतात तेव्हाच ती एकमेकांसाठी योग्य आहेत की नाही याचा अंदाज त्या दोघांना येतो, असं मत हिमांश व्यक्त केलं. हिमांश आणि नेहाचं केव्हाच ब्रेकअप झालं आहे पण अजूनही अनेकदा नेहासोबत हिमांशचं नावही जोडलं जातं. हिमांश आणि नेहा 2014 पासून 2018 पर्यंत रिलेशनमध्ये होते. त्यांनी म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र कामही केलं आहे. नेहाने इंडिअन आयडॉल या रिआरलिटी शोमध्ये आपलं प्रेम जगजाहीर केलं होतं. हिमांशशी ब्रेकअप झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये होती अशादेखील चर्चा रंगल्या होत्या. हिमांश कोहलीच्या नावानंतर तिचं नाव उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणशीही जोडलं गेलं होतं. आदित्य इंडियन आयडॉल हा शो होस्ट करत होता तेव्हा नेहा तिथे जज म्हणून काम पाहत होती. आदित्य आणि नेहाचं लग्न होणार नाही हे स्पष्टपणे सांगत स्वत: उदित नारायण यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Neha kakkar

    पुढील बातम्या