VIDEO: सेलिब्रेशन वगैरे ठीक आहे पण मास्क कुठेय? नेहा कक्करला नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर
VIDEO: सेलिब्रेशन वगैरे ठीक आहे पण मास्क कुठेय? नेहा कक्करला नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर
सेलिब्रिटींनीच असा बेफिकीरपणा दाखवला तर सामान्य माणसंदेखील त्यांचंच अनुकरण करतील अशी टीका नेहा कक्करच्या (Neha Kakkar) मास्क (Mask) न लावता फिरण्यावर होत आहे.
मुंबई, 01 जानेवारी: गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) तिच्या करिअरमध्ये अतिशय यशस्वी आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचं धुमधडाक्यात लग्न झालं होतं. देशात आणि देशाबाहेरही नेहाचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. हे सगळं असलं तरी तिने कोरोनाच्या नियमांचा भंग केल्यामुळे चाहत्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.
झालं असं की, नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी भटकंतीला निघाले होते. विमानतळावरील त्यांचा एका व्हिडीओ विरल भयानीने शूट केला. या व्हिडीओमध्ये दोघांनीही मास्क घातला नव्हता. हा व्हिडीओ जसा व्हायरल झाला तसं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहीलं, ’या दोघांना कोरोनाचं व्हॅक्सीन मिळालं आहे वाटतं.’ एकाने लिहीलं, ‘तुमच्या सेलिब्रेशनचं ठीक आहे पण विमानतळावर जाताना मास्क का लावला नाहीत?’ अशा वेगवेगळ्या कॉमेंट्स करत नेटकऱ्यांनी नेहा आणि रोहनप्रीतला चांगलंच फैलावर घेतलं आहे.
ट्रोल होण्याची नेहाची ही पहिलीच वेळ नाही. अलिकडेच नेहाने एका गाण्यासाठी प्रेग्नंट असल्याचं दाखवत एक फोटो शेअर केला होता. हा फोटो 'खयाल रखा कर' या गाण्यासाठी शेअर केला होता हे समजताच अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. नेहा आणि रोहनप्रीत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारं कपल आहे. त्या दोघांच्या लग्नापासून ते हनीमूनपर्यंत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.