हिमांश कोहलीसोबत ब्रेकअपबद्दल नेहा कक्करचा धक्कादायक खुलासा, म्हणाली...

हिमांश कोहलीसोबत ब्रेकअपबद्दल नेहा कक्करचा धक्कादायक खुलासा, म्हणाली...

इंडियन आयडॉलच्या मंचावर बोलताना नेहानं तिच्या ब्रेकअपविषयी मोठा खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : आपला आवाज आणि स्टाइलमुळे सर्वांना वेड लावणारी बॉलिवूड सिंगर नेहा कक्करने नुकताच तिच्या पर्सनल लाइफबद्दल खूपच धक्कादायक खुलासा केला आहे. नेहा कक्कर सध्या सिंगिंग रिअलिटी शो इंडियन आयडॉलमध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. काही महिन्यांपूर्वी नेहा आणि तिचा बॉयफ्रेंड हिमांश कोहली यांचं ब्रेकअप झालं त्यानंतर नेहा खूप चर्चेत होती. त्यानंतर आता इंडियन आयडॉलच्या मंचावर बोलताना नेहानं तिच्या ब्रेकअपविषयी मोठा खुलासा केला आहे. यावेळी ती एवढी भावुक झाली की तिला अश्रू आवरणंही कठीण झालं होतं.

इंडियन आयडॉलच्या शनिवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये नेहा हिमांश कोहलीसोबत ब्रेकअपवर बोलली. यावेळी भावुक होत नेहा म्हणाली, हिमांश कोहलीशी ब्रेकअपनंतर मी खूप तुटले होते. तो माझ्या आयुष्यातील असा काळ होता ज्यात मी सर्वाधिक दुःखी होते. मला त्यावेळी जगावंसंही वाटत नव्हतं. मला आत्महत्या करावीशी वाटत होती.

OMG! सिनेमाच्या शूटिंगमुळे नाही तर या आजारामुळे सलमान सोडतोय बिग बॉस

 

View this post on Instagram

 

Full Video in Bio Big Big Thanks to @anshul300 @babbu11111 @manindarbuttar @mixsingh @gurinderjit1 @singh.shinda @desimusicfactory @raghav.sharma.14661

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

नेहा पुढे म्हणाली, हिमांशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मला वाटलं की माझं नशीब माझ्यासोबत खूपच वाईट वागत आहे. मला जगण्याची इच्छा नव्हती. पण आता मी त्यातून बाहेर पडले आहे आणि आता खूप चांगलं जीवन जगत आहे.

वयाच्या 12 व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ही अभिनेत्री

नेहा कक्कर आणि हिमांश कोहली 4 वर्षं रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर एक रिअलिटी शोमध्ये हिमांशनं त्यांचं नातं ऑफिशिअल केलं होतं. यानंतर त्यांनी काही अल्बमध्येही एकत्र काम केलं होतं. मात्र त्यानंतर काही दिवसांतच या दोघांचं ब्रेकअप झालं आणि नेहा डिप्रेशनमध्ये गेली होती. नुकताच तिनं रोहित खंडेलवालसोबत एक अल्बम साँग सुद्धा केलं आहे.

True Gentleman पत्नी गौरीचा गाउन सांभाळताना दिसला शाहरुख खान VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 01:41 PM IST

ताज्या बातम्या