मुंबई, 22 फेब्रुवारी : बॉलिवूडाचा प्रसिद्ध गायक मीका सिंगच्या स्टुडिओमध्ये काम करणार्या त्याच्या सौम्या नावाच्या मॅनेजरने आत्महत्या केली आहे. सौम्याने झोपेच्या गोळ्या खात मीका सिंगच्या स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार ही घटना 2 फेब्रुवारी 2020 रोजी घडली. 02 फेब्रुवारी रोजी मीका सिंगच्या स्टुडिओमध्ये सौम्या सोयब खान नावाच्या 28 वर्षीय महिलेने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. दरम्यान, वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अद्याप आत्महत्येमागील कारणांचा शोध लागलेला नाही. सौम्याने कोणतीही सुसाइड नोट सोडली नाही, यामुळे सर्व शक्य कारणास्तव पोलीस तपास करत आहेत.
सौम्याच्या मृत्यूनंतर मीका सिंगने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहित शोक व्यक्त केला. सौम्याचा फोटोसह त्यानं, 'वाहेगुरु दा खालसा वाहेगुरू जी का फतेह. आमची लाडकी सौम्या सर्वांना सोडून गेली. तिचे सोडून जाणे वाईट होते. अगदी लहान वयातच तिने आपल्या मागे अनेक प्रेमळ आठवणी सोडल्या आहेत. तिच्या आत्म्यास शांती लाभो', असे भावूक करणारे कॅप्शन दिले आहे.
पंजाबमध्ये झाले अंत्यसंस्कार
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सौम्याचा मृतदेह पंजाबमधील तिच्या घरी नेण्यात आला, तेथेच तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला. सौम्याचे आई-वडिल नसल्यामुळे तिच्या आजी आजोबांनी तिचा अंत्यसंस्कार विधी केली. सौम्या मुंबईच्या मीका सिंगच्या स्टुडिओत राहत होती. सौम्याच्या मृत्यूविषयी तिचा नवरा जोहेब खान आणि गायक मीका सिंह या दोघांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mika Singh