मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mahesh Kale: 'तरी त्यानं एक तास आमचा पाठलाग केला'; गायक महेश काळेनं सांगितला 'तो' अनुभव

Mahesh Kale: 'तरी त्यानं एक तास आमचा पाठलाग केला'; गायक महेश काळेनं सांगितला 'तो' अनुभव

सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात सध्या परीक्षक म्हणून भूमिका निभावलेला गायक महेश काळेनं त्याला आलेला एक अनुभव शेअर केला आहे.

सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात सध्या परीक्षक म्हणून भूमिका निभावलेला गायक महेश काळेनं त्याला आलेला एक अनुभव शेअर केला आहे.

सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात सध्या परीक्षक म्हणून भूमिका निभावलेला गायक महेश काळेनं त्याला आलेला एक अनुभव शेअर केला आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 10 ऑगस्ट: शास्त्रीय गाण्यावर आपली वेगळी छाप पाडून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा तरुण गायक म्हणजे महेश काळे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता महेश काळे आजकाल सोशल मीडियावर चांगलाच अँक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे. महेश सातत्यानं सनफ्रान्सिस्को ते मुंबई असा प्रवास करत असतो. महेश त्याच्या प्रवासादरम्यानचे मिनी व्लॉग्सही त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. दरम्यान या प्रवासात त्याला अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात. असाच एक अनुभव महेशनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. महेश एकेठिकाणी गेला असता एका व्यक्तिनं त्याचा पाठलाग केल्याचं महेशनं म्हटलं आहे. कोण होती ती व्यक्ती जाणून घ्या. गायक महेश काळेला प्राणी प्रचंड आवडतात. तो प्रचंड प्राणी प्रेमी आहे. सोशल मीडियावरही तो प्राण्यांबरोबरचे काही फोटो शेअर करत असतो.  प्राण्यांबद्दल त्याच्या मनात फार आत्मियता, प्रेम आहे.  महेश एकेठिकाणी कार्यक्रमासाठी गेला असता महेशला एक श्वान भेटला. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र तरीही तो महेशच्या मागे आला. जवळपास एक तास त्यानं त्याचा पाठलाग केला. त्याचं हे अपेक्षाविरहीत प्रेम पाहून महेश भारावून गेला. त्यानं त्या श्वानाबरोबरचा एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. हेही वाचा - Hruta Durgule: हृतानं हनिमूनला घातलेल्या ड्रेसला काय म्हणतात माहितेय का? अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करत सांगितलं
View this post on Instagram

A post shared by Mahesh Kale (@maheshmkale)

महेशनं रस्त्यावरील एका कुत्र्याबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलंय, 'श्वानांकडे देण्यासारखं खूप काही असतं. त्यांच्याकडून आपण खूप काही शिकायला हवं. त्याच्या पायाला दुखापत झालेली असतानाही कोणत्याही अपेक्षेशिवाय त्यानं आमच्यासाठी प्रेम व्यक्त केलं. त्यांनं आधी आमचा पाठलाग केला नंतर आम्हाला 1-2 तास चांगली कंपनी दिली'. महेशच्या या पोस्टवर अनेकांनी प्रेम व्यक्त केलं आहे. महेशच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर महेश सध्या कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात परीक्षण करत आहे. मोठ्या ब्रेकनंतर महेश पुन्हा एकदा परीक्षकाच्या भूमिकेत परत आला आहे. त्याचं अचूक परीक्षण पुन्हा एकदा स्पर्धकांना मिळणार आहे. महेशबरोबर गायक अवधूत गुप्तेही परीक्षकाच्या भूमिकेत आहे.
First published:

Tags: Marathi entertainment, Singer

पुढील बातम्या