गायक लकी अलीचा आणखी एक VIDEO व्हायरल; 'ते' गाणं ऐकून तुम्हीही व्हाल नॉस्टॅल्जिक

गायक लकी अलीचा आणखी एक VIDEO व्हायरल; 'ते' गाणं ऐकून तुम्हीही व्हाल नॉस्टॅल्जिक

प्रसिद्ध गायक लकी अली (Lucky Ali) यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘ओ सनम’ या गाण्याचं अनप्लग् व्हर्जन ऐकून तुम्हालाही जुन्या आठवणी आल्याशिवाय राहणार नाहीत.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर: गायक लकी अलीची (Lucky Ali) क्रेझ अजूनही त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात त्याची अवस्था अशी झाली होती की त्याला ओळखताही येत नव्हतं. आता त्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. यात तो 'ओ सनम' हे गाणं गाताना दिसत आहे. त्याचा हा नवा व्हिडीओही चांगलाच व्हायरल होत आहे.

नफीसा अली सोढ़ी  यांनी हा अनसीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. गोव्याच्या एका गावातला हा व्हिडीओ आहे. व्हिडिओमध्ये, लकी 'जाये तो ...' अशी ओळ म्हणून थांबतो. यावर तिथे उपस्थित लोक त्याचं गाणं पूर्ण करतात. त्याच्या गाण्याचं हे अनप्लग व्हर्जन सध्या सोशल मीडियावर हिट होत आहे. ज्येष्ठ अभिनेता मेहमूद हे लकी अली यांचे वडील. लकी अली स्वत: उत्तम गीतकार आणि संगीतकार आहेत. 'ना तुम जानो ना हम', 'एक पल का जीना', 'सफरनामा'  अशी अनेक गाणी गायली आहेत. लकी अली यांचे खरे नाव मकसूद मेहमूद अली आहे.

लकी यांनी पहिलं लग्न त्यांच्या अल्बममधील सहकलाकार मेघन जेन मॅकक्लिअरीसोबत केलं. 'सुनो' या अल्बममध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. मात्र दोन मुलांचे पालक झाल्यानंतर हे दोघं विभक्त झाले. त्यानंतर त्यांचं आणखी एक लग्न झालं पण तेही फार काळ टिकलं नाही. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी तिसरं लग्न केलं. गेली अनेक वर्ष ते लाइमलाइटपासून दूर होते. पण त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 13, 2020, 4:05 PM IST

ताज्या बातम्या