Home /News /entertainment /

Welcome 2021 : लतादीदींनी पंतप्रधान मोदींना दिल्या नववर्षाच्या खास शुभेच्छा

Welcome 2021 : लतादीदींनी पंतप्रधान मोदींना दिल्या नववर्षाच्या खास शुभेच्छा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) कामांचं कौतुक केलं आहे. तसंच त्यांना ट्विटवरुन शुभेच्छाही दिल्या आहेत.

    मुंबई, 01 जानेवारी : नववर्षाचं स्वागत सगळीकडे मोठ्या उत्साहात सुरू आहे. सामान्य माणसांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा (Happy New Year 2021) देत आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) खास शुभेच्छा दिल्या आहेत. लतादीदींना ट्विटरवर एक छानशी पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहीलं आहे, ‘सदर प्रणाम नरेंद्रभाई, तुम्ही देशासाठी जे काम करत आहात ते प्रशांसनीय आहे मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुमच्या आईला माझा नमस्कार’ या ट्वीटसोबत लता मंगेशकर यांच्या आवाजातलं वंदे मातरम् हे गाणंदेखील शेअर करण्यात आलं आहे. लता दीदींच्या ट्वीटला अवघ्या 10 मिनिटात नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी त्यांचा ट्वीट लाइक केलं आहे. नेटकरी त्यांचं ट्वीट रिट्वीटदेखील करत आहेत. मंगेशकर कुटुंबाने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. लता मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजामुळे त्यांचे देशातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहेत. वयोमानानुसार आता लतादीदी प्रेक्षकांसमोर गात नसल्या तरी प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील लता मंगेशकर यांच्या गाण्याचे चाहते आहेत. पंतप्रधनांनी देखील देशवासियांना नव-वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    पुढील बातम्या