मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Lata Mangeshkar : सम्राज्ञी! लता मंगेशकर यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर, माहितीपटाची घोषणा

Lata Mangeshkar : सम्राज्ञी! लता मंगेशकर यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर, माहितीपटाची घोषणा

लता मंगेशकर सम्राज्ञी माहितीपट

लता मंगेशकर सम्राज्ञी माहितीपट

लता दीदींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर आधारीत माहितीपटाची घोषणा करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  28 सप्टेंबर: भारतच नाही तर संपूर्ण जगावर आपल्या गाण्यानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकोकीळा दिवंगत गायिका लता मंगेशकर. लता दीदी आपल्यातून निघून गेल्या आहेत यावर आजही विश्वास बसत नाही. त्या नसल्या तरी गाण्याच्या रुपात त्यांच्या आवाजाच्या रुपात त्या आजही आपल्यातच आहेत. आज लता दीदींची जयंती. आजच्या दिवशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला तर दुसरीकडे लता दीदींचा जीवनपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. लता दीदींच्या आयुष्यावर आधारित माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या माहितीपटाची घोषणा करण्यात आली आहे.

लता दीदींच्या आयुष्यावरील कलाकृती फारचं खास असणार आहे. 'सम्राज्ञी' असं लता दीदींच्या माहितीपटाचं नाव आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टरही समोर आलं आहे. आज लता दीदींच्या  जयंतीचं औचित्य साधून सिनेमाची घोषणा करण्यात आली. सम्राज्ञी या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार मयुरेश पै करणार आहेत. तर अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स आणि लतिका क्रिएशन्स हे सम्राज्ञी या माहितीपटाची निर्मिती करणार आहेत.

हेही वाचा - Lata Mangeshkar Award : उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

लता दीदींच्या जयंतीदिनी सिनेमाच्या दिग्दर्शन आणि निर्मात्यांनी मंगेशकर कुटुंबियांची भेट घेतली. माहितीपटाच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आलं.  लता दीदींच्या आयुष्यावर आधारित ही पहिलीच कलाकृती असणार आहे. त्यामुळे लता दीदींच्या लाखो चाहत्यांचं याकडे लक्ष आहे. माहितीपट असला तरी लता दीदींची भुमिका यात कोण साकारणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.  देशाच्या स्वरसम्राज्ञीला या कलाकृतीतून मानाचा मुजरा करण्यासाठी या कलाकृतीची निर्मिती केली जाणार आहे.

लता दीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे झाला. पंडित दिनानाथ मंगेशकर सारखे वडील लता दीदींना लाभले. गाण्याचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. 980 हून अधिक हिंदी सिनेमात गाणी तर 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये लता दीदींनी गाणी गायली.  भारतरत्न पुरस्कार नावे असलेल्या लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाच्या धक्क्यात आजही त्यांचे लाखो चाहते बाहेर आलेले नाहीत.

First published:

Tags: Bollywood News, Marathi entertainment, Marathi news