मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मला माहीत होतं माझ्यावर कोणी विषप्रयोग केला पण...' लतादीदींनी केला मोठा गोप्यस्फोट

'मला माहीत होतं माझ्यावर कोणी विषप्रयोग केला पण...' लतादीदींनी केला मोठा गोप्यस्फोट

लता मंगेशकर म्हणतात, ‘मला माहित होतं की, माझ्यावर कोणी विषप्रयोग केला आहे. पण माझ्याकडे त्या व्यक्तीबद्दल कोणतेही पुरावे नव्हते.'

लता मंगेशकर म्हणतात, ‘मला माहित होतं की, माझ्यावर कोणी विषप्रयोग केला आहे. पण माझ्याकडे त्या व्यक्तीबद्दल कोणतेही पुरावे नव्हते.'

लता मंगेशकर म्हणतात, ‘मला माहित होतं की, माझ्यावर कोणी विषप्रयोग केला आहे. पण माझ्याकडे त्या व्यक्तीबद्दल कोणतेही पुरावे नव्हते.'

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई 27 नोव्हेंबर: ज्यांच्या सुमधूर आवाजाने देशालाच नाही तर जगाला वेड लावलं, लोकांच्या मनात संगीताची आवड निर्माण केली त्या गायिका म्हणजे लता मंगेशकर (Lata Mangeshkar). पण एकेकाळी या गानसम्राज्ञीवर विषप्रयोग झाला होता. या घटनेबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसेल. मंगेशकर कुटुंबही याबाबत फारशी वाच्यता करत नाहीत. पण ज्या वेळी लतादीदींचं गाणं ऐन बहरात येत होतं, त्याच वेळी हा सुमधूर आवाज कायमचा बंद करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लता मंगेशकर यांनी ही माहिती दिली.

ही घटना घडली 1963 मध्ये. लता मंगेशकर यांच्या गाण्याची ख्याती सगळ्या देशामध्ये पसरली होती. पण त्या घटनेबद्दल बोलताना लता मंगेशकर सांगतात, ‘ही खूप जुनी घटना आहे. आम्ही त्या दिवसांबद्दल फारसं बोलत नाही. पण त्यावेळी माझ्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. विषप्रयोगामुळे मला प्रचंड अशक्तपणा आला होता. मी अनेक दिवस झोपून होते. माझं गाणं कायमचं बंद होईल अशा अफवा पसरल्या होत्या. पण त्या फक्त अफवाच होत्या. विषप्रयोगामुळे मला फार त्रास झाला होता. वजन कमी झालं होतं. पण मला गाणं सोडायचं नव्हतं. जवळजवळ 3 महिने आराम केल्यानंतर, अशाच एका दिवशी आमच्या घरी हेमंत कुमार आले त्यांना माझ्याकडून गाणं गाऊन घ्यायचं होतं. पण रेकॉर्डिंग करावं की नाही या संभ्रमात मी आणि माझं कुटुंब होतं. अखेर आईच्या परवानगीनंतर मी गाणं गायलं’ लतादीदींनी या दुर्घटनेनंतर गायलेलं पहिलं गाणं होतं, ‘कही दीप जलें कहीं दिल..’ हे गाणं आजही लोकांच्या स्मरणातून गेलेलं नाही.

विषप्रयोग झाल्यानंतरच्या अनुभवाबद्दल सांगताना लता मंगेशकर म्हणतात, ‘मी आजारी असताना डॉक्टर आर. पी कपूर यांनी मला पुन्हा उभं राहण्याचं बळ दिलं ते आमचे फॅमिली डॉक्टर होते. मजरुह सुलतानपुरी यांनी त्या काळात त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून माझ्यासाठी वेळ काढत. ते मला भेटायला आमच्या घरी येत.’

लता मंगेशकर म्हणतात, ‘मला माहित होतं की, माझ्यावर कोणी विषप्रयोग केला आहे. पण माझ्याकडे त्या व्यक्तीबद्दल कोणतेही पुरावे नव्हते. त्यामुळे मी काहीच करू शकले नाही. पण एखादी व्यक्ती असं वागू शकते असा अनुभव घेऊन मला धक्काच बसला होता.’

First published:

Tags: Marathi entertainment