मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Singer KK last moments captured in CCTV: हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये दिसला KK, शेवटचे क्षण CCTV त कैद

Singer KK last moments captured in CCTV: हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये दिसला KK, शेवटचे क्षण CCTV त कैद

सिंगरच्या शेवटच्या लाईव्ह कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता सिंगरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

सिंगरच्या शेवटच्या लाईव्ह कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता सिंगरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

सिंगरच्या शेवटच्या लाईव्ह कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता सिंगरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पश्चिम बंगाल, 02 जून: लोकप्रिय गायक केके (Popular Singer KK) यांच्या आकस्मिक निधनाने (KK died) संपूर्ण देश हादरला आहे. मंगळवारी रात्री कोलकाता येथे एका लाइव्ह कॉन्सर्टनंतर हृदयविकाराच्या झटक्याने केके यांचे निधन झाले. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर केकेने स्टेज सोडला. सिंगरच्या शेवटच्या लाईव्ह कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता सिंगरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर रुग्णालयात नेण्यापूर्वी गायक केके (Singer KK) कोलकाता येथील हॉटेलच्या कॉरिडॉरमधून जातानाचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले आहे.

पोलिसांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री परफॉर्म केल्यानंतर केके हॉटेलमध्ये पोहोचला होता आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

केकेनं केली होती तक्रार

याआधी केकेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याला चाहत्यांच्या गर्दीने घेरले होते. त्याची टीम त्याला घटनास्थळावरून परत नेण्याचा प्रयत्न करत होती. व्हिडिओमध्ये केकेचे एक्सप्रेशन पाहून तो खूप थकला होता याचा अंदाज सहज लावता येतो. दुसर्‍या व्हायरल क्लिपमध्ये दिवंगत गायक आपल्या टीमला कार्यक्रमावरील गरमी आणि आर्द्रतेबद्दल सांगताना देखील ऐकलं आहे.

आज होणार अंत्यसंस्कार

केके यांचे पार्थिव कोलकाता येथील रवींद्र सदनमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पत्नी ज्योती आणि मुलांनी पुष्पहार अर्पण केला. केके यांचे पार्थिव बुधवारी, 1 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता मुंबईत पोहोचेल. वृत्तानुसार केके यांच्यावर अंत्यसंस्कार गुरुवारी, 2 जून रोजी मुंबईत होणार आहे.

गन सॅल्यूटच्या सलामीसह, बंगाल पोलिसांनी KK ला अंतिम निरोप दिला. त्यानंतर एअर इंडियाच्या विमानाने त्यांचे पार्थिव कोलकाताहून मुंबईत आणण्यात आले. वर्सोव्याच्या पार्क प्लाझामध्ये सकाळी 10 ते 12.30 या वेळेत केके यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वर्सोवा येथील स्मशानभूमीत दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लाईव्ह कॉन्सर्टनंतर मृत्यू

गायक कृष्णकुमार कुन्नथ यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. ते केके या नावाने प्रसिद्ध होते. केके 53 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. दक्षिण कोलकाता येथील नझरूल मंच येथे एका महाविद्यालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जेव्हा केके सुमारे एक तास गाऊन त्यांच्या हॉटेलवर परतले तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पश्चिम बंगाल सरकारने केके यांच्या पार्थिवावर बंदुकीची सलामी देऊन त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिवंगत गायकाला पुष्पांजली वाहिली, ज्यांचे पार्थिव रवींद्र सदनमध्ये ठेवण्यात आले होते.

First published:

Tags: West bengal