मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सलमानच्या 'त्या' गाजलेल्या गाण्यामुळं KKला मिळाला होता पहिला ब्रेक; आता त्याच अभिनेत्यासाठी रेकॉर्ड केलं शेवटचं गाणं

सलमानच्या 'त्या' गाजलेल्या गाण्यामुळं KKला मिळाला होता पहिला ब्रेक; आता त्याच अभिनेत्यासाठी रेकॉर्ड केलं शेवटचं गाणं

सलमानच्या 'त्या' गाजलेल्या गाण्यामुळं KKला मिळाला होता पहिला ब्रेक, आता त्याच अभिनेत्यासाठी  रेकॉर्ड केलं शेवटचं गाणं

सलमानच्या 'त्या' गाजलेल्या गाण्यामुळं KKला मिळाला होता पहिला ब्रेक, आता त्याच अभिनेत्यासाठी रेकॉर्ड केलं शेवटचं गाणं

'तडप तडप' या सलमान खानवर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यामुळे केकेला पहिला ब्रेक मिळाला होता. आता त्याच सलमान खानसाठी केकेनं त्याच्या आयुष्यातील शेवटचं गाणं रेकॉर्ड केलं. कोणतं आहे ते गाणं जाणून घ्या.

मुंबई, 02 जून: प्रसिद्ध गायक केकेचा (KK Death) मंगळवारी रात्री कोलकत्ता येथे लाईव्ह कॉन्सर्टनंतर मृत्यू झाला. आज केकेवर मुंबईतील वर्सोवा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले (KK Funeral)  केकेच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या केकेने आज सर्वांना अखेरचा निरोप दिला.  केकेनी 'अजब सी', 'दिल इबादत', 'पल', 'तडप तडप', 'दिल क्यू यह मेरा', 'खुदा जाने', 'अलविदा' सारखी हिट गाणी बॉलिवूडला दिली. प्रत्येक वयातील प्रेक्षकांसाठी केकेचा आवाज जवळचा होता.  केके जरी आज आपल्यात नसला तरी त्याने गायलेली हिट गाणी कायम आपल्या सोबत असणार आहेत.  'हम रहें या ना रहें कल', हे केकेने गायलेलं शेवटचं गाणं ठरलं. 'तडप तडप' या सलमान खानवर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यामुळे केकेला पहिला ब्रेक मिळाला होता. आता त्याच सलमान खानसाठी केकेनं त्याच्या आयुष्यातील शेवटचं गाणं रेकॉर्ड केलं.

'टायगर 3' या अपकमिंग सिनेमात चाहत्यांना त्यांच्या लाडक्या केकेच्या आवाजातील त्याचं शेवटचं गाणं ऐकायला मिळणार आहे.  'टायगर 3' हा सिनेमा 21 एप्रिल 2023मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खान आणि कॅटरिना कैफ आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहेत.

सांगायचं झालं तर केकेचं पहिलं सुपरहिट गाणं देखील त्यानं सलमान खानसाठीच गायलं होतं ते गाणं होतं 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे गाणं.  महबूब आणि इस्माइल यांनी संगीतबद्ध केलेल्या 'तडप तडप'  या गाण्याने प्रेक्षकांची मन जिंकली. केकेच्या गाण्यानं प्रेमभंग झालेल्या अनेक तरुणांना भावना व्यक्त करण्यासाठी गाणं दिलं. 'तडप तडप' हे गाणं केकेच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरलं. या गाण्याने केकेच्या करिअरला मोठा ब्रेक मिळाला आणि त्यानंतर केके पुन्हा कधीच मागे वळून पाहावं लागलं नाही.

'हम दिल दे चुके सनम'बरोबरच केकेनं सलमानच्या अनेक सिनेमातील गाण्याला आवाज दिला आहे. 'तेरे नाम', 'ओ जाना', 'एक था टायगर'मधील 'लापता', 'बजरंगी भाईजान'मधील 'तू जो मिला', 'ट्यूबलाई'टमधील 'मैं अगर' अशी अनेक शानदार गाणी केकेनं सलमानसाठी गायली आहेत.

केकेच्या मृत्यूनंतर सलमान खानने भावूक होत केकेसाठी पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली, 'केके तुमच्या कुटुंबियांप्रती सहवेदना. तुम्ही कायम तुमच्या गाण्यामुळे आमच्या आठवणीत रहाल. RIP KK', अशी भावूक पोस्ट सलमाननं शेअर केली.

First published:

Tags: Bollywood News, Kolkata, Salman khan, Singer