नववधूच्या वेषात अधिकच खुललं कार्तिकी गायकवाडचं रुप; मराठमोळ्या लूकमधील VIDEO व्हायरल

नववधूच्या वेषात अधिकच खुललं कार्तिकी गायकवाडचं रुप; मराठमोळ्या लूकमधील VIDEO व्हायरल

लिट्ल चॅम्प किर्तिकी गायकवाड ते नुकतंच लग्न झालेली किर्तिकी गायकवाड - पिसे (Kartiki Gaikwad Pise) हा बदल तिच्या चाहत्यांना अतिशय आवडला आहे. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर: आपल्या ठसकेबाज आवाजामुळे अगदी लहान वयातच महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) लग्नाच्या बेडीत अडकली आहे. कार्तिकीच्या नव्या आयुष्याची इनिंग जोरदार सुरू झाली आहे. लग्नानंतर कार्तिकीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लिट्ल चॅम्सच्या रुपात आपण सर्वांनीच कार्तिकीला पाहिलं होतं. आता तिला नववधूच्या वेषात पाहतानाही तिच्या चाहत्यांना तिचं कौतुक वाटत आहे.

कार्तिकीनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये तिने एक हिरव्या रंगाची एक नऊवारी साडी नेसली आहे. हातात हिरवा चुडा, गळ्यात हार, केसात फुलं या सगळ्या साज श्रृंगारामध्ये कार्तिकी अतिशय सुंदर दिसत आहे.

10 डिसेंबर 2020 रोजी कार्तिकी गायकवाडचं लग्न झालं होतं. रोनित पिसे (Ronit Phise) असं कार्तिकीच्या पतीचं नाव आहे. रोनित पेशाने मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याचा स्वत:चा व्यावसाय आहे.  26 जुलै  2020 रोजी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. रोनित हा कार्तिकीच्या वडीलांच्या मित्राचाच मुलगा आहे. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये कार्तिकीचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला गायिका आर्या आंबेकर, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडही उपस्थित होत्या.

लिटील चॅम्प्समध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली असताना तिने विविध बाजाची गाणी म्हटली होती. पण अभंग, गवळणी गाताना तिचा आवाज अधिकच खुलायचा. गजर किर्तनानाचा या कार्यक्रमामध्ये ती निवेदिका म्हणूनही समोर आली आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 15, 2020, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading