मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पाकिस्तानी गायक फरहाद हुमायूं काळाच्या पडद्याआड, चाहत्यांवर दु:खाचा डोंगर

पाकिस्तानी गायक फरहाद हुमायूं काळाच्या पडद्याआड, चाहत्यांवर दु:खाचा डोंगर

पाकिस्तानाच नव्हे तर भारतात आणि अन्य देशातही लोकप्रिय असलेल्या पाकिस्तानी संगीतकार (Musician) फरहाद हुमायूं (Farhad Humayun) याचं निधन झालं आहे. अवघ्या 42 वर्षांच्या या गुणी संगीतकाराच्या अशा अकाली निधनानं त्याच्या लाखो चाहत्यांना आणि संगीतक्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 09 जून: पाकिस्तानाच नव्हे तर भारतात आणि अन्य देशातही लोकप्रिय असलेल्या पाकिस्तानी संगीतकार (Musician) फरहाद हुमायूं (Farhad Humayun) याचं निधन झालं आहे. अवघ्या 42 वर्षांच्या या गुणी संगीतकाराच्या अशा अकाली निधनानं त्याच्या लाखो चाहत्यांना आणि संगीतक्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. फरहाद हुमायूंच्या या अचानक जाण्यानं पाकिस्तानातील संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. जगभरातून त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. अनेक सेलेब्रिटी, चाहते यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपलं दुःख व्यक्त केलं आहे.

फरहाद हुमायूंच्या निधनाची बातमीही सोशल मीडियावरूनच (Social Media) देण्यात आली आहे. परंतु, त्याच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या फेसबुक पेजवर त्याच्या फोटोसह एक पोस्ट शेअर करण्यात आली असून, त्यात त्याचे निधन झाल्याचं सांगण्यात आलं आहे. ‘फरहाद हुमायूं आज सकाळी आपल्याला सोडून गेला. आव्हानांना निर्भीडपणे सामोरा जाणारा, मूल्यांशी तडजोड न करणारा,  चुकांना उदारपणे माफ करणारा अत्यंत मिश्कील, उमद्या स्वभावाचा फरहाद आपल्या सगळ्यांना सोडून गेला. आत्मा आणि कलेच्या बाबतीत फादी नेहमीच काळाच्या पुढे होता. आयुष्य साजरं करावं अशी त्याची इच्छा होती, म्हणून आम्ही त्याचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी त्याच्या इच्छेचा सन्मान करावा आणि त्याच्यासाठी प्रार्थना करावी.’ असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फरहादच्या अकाली निधनाबद्दल गायक अली जफरनंही (Ali Jafar) तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ‘अलविदा दोस्ता. अनेक लोकांसाठी तू प्रेरणास्थान होतास. संगीत आणि लोकांच्या आयुष्यातील तुझं योगदान शब्दात करणं शक्य नाही. तू केवळ संगीतकार आणि कलाकार नव्हतास तर त्याहून अधिक काहीतरी होतास. तू एक लढवय्या होतास...तू महान होतास आणि हे त्या महानतेचे भाग्य होते.'

तर गायक आतिफ असलम (Atif Aslam) यानंही ट्विटरवर आपल्या फरहादला श्रद्धांजली वाहणारी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘थँक यू फादी, उत्तम संगीत आणि उत्तम काळ देण्यासाठी तसंच माझ्या पहिल्या अल्बमवर काम करण्यासाठी वेळ देण्याकरता.  आपण एकत्रित काम करण्याच्या कल्पनेनं मी रोमांचित झालो होतो. काही गाण्यांचे कामही मी पूर्ण केलं होतं; पण आपण ते पूर्ण करू शकणार नाही याची कल्पना नव्हती.’ अशा शब्दात त्यानं आपल्या भावना या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.

First published:

Tags: Pakistan