मुंबई, 06 ऑक्टोबर : सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल आणि तिला महत्त्व प्राप्त होईल हे सांगता येत नाही. दिग्दर्शक, गायक, संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Singer Avadhoot Gupte) बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. अवधूतच्या एका गाण्याला (Avadhoot Gupte Song)तब्बल वर्षभराने प्रसिद्धी मिळाली आहे. अवधूतने यासंबधी माहिती सोशल मीडियावर पोस्ट लिहित दिली आहे. हे गाणं व्हायरल (Jaat Rap Song)होण्यामागे त्याने कोल्हापूर कनेक्शन काय आहे हे देखील सांगितले आहे.
अवधूत गुप्तेने इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, एखादं गाणं कधी केव्हा आणि कोणामुळे लोकांपर्यंत पोहोचेल हे साक्षात भगवंत सुद्धा सांगू शकणार नाहीत!! "जात" हे रॅप गाणं खरंतर मी मागच्या वर्षी केलं. परंतु, आमच्या कोल्हापूरचे श्री. कुलदीपजी कुंभार साहेब ह्यांच्या कानावर ते आत्ता पडलं... काही दिवसांपूर्वी. मग, त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले हे गाणं लोकांपर्यंत पोहोचायला हवं आणि त्यासाठी मी विशेष प्रयत्न करतो. त्यांनी नक्की काय काय केलं हे मला खरच माहीत नाही.
View this post on Instagram
परंतु, त्यानंतर जणू काही हे गाणं आत्ताच रिलीज झाल्यासारखे मला अनेक फोन आले आणि YouTube वर गाण्याचे views सुद्धा वाढले! ह्यासाठी मी कुंभार साहेबांचा ऋणी आहे. समाजाच्या पिकाला लागलेली ‘जात‘ नावाची कीड ही वरवरची नाही. ती मातीत खोलवर रुजलेली आहे. ती काढून टाकण्यासाठी एखादे गाणे पुरेसे नाही. पण आपण प्रयत्न करत राहू.. काय? बरोबर ना? आज जो मारतो.. उद्या तेचा बी हात दुखतोच!!’
वाचा :Tiger 3: सलमान खान आणि कतरिना कैफसाठी मुंबई मध्येच उभारलं जातंय 'Middle East'
अवधूत गुप्ते हा गुणी कलाकार मराठी सिनेसृष्टीला लाभला आहे. तो उत्तम संगीतकार आहेच. शिवाय तो उत्तम गातो हे आपण सगळेच जाणतो. कारण, अवधूत गुप्ते संगीतकार, गायक यांसोबत तो निर्माता, दिग्दर्शकही आहे. अनेक नव्या गोष्टी तो सातत्याने करत असतो. त्याने सुरूवातील आणलेला जय जय महाराष्ट्र माझा.. हे गाणं असू दे किंवा मनमोराचा कसा पिसारा फुलला.. हे गाणं असू दे. त्याने नेहमीच हटके प्रयोग केले व ते लोकांना आव़डले आहेत.
वाचा :'प्रिया माझी रत्नजडित तलवार...', प्रिया-उमेशच्या संसाराची 10 वर्ष, उखाण्याचा गोड Video Viral
काहीतरी हटके करायच्या हेतून त्याने हे गाणं केलं हे खरं आहे. पण असं असलं तरी त्यातून काहीतरी मेसेज द्यायचा प्रयत्न त्याने केलं आहे. या गाण्याचं नाव 'जात' आहे. साधारण एका वर्षापूर्वी त्याने हे गाणं केले होते. अवधूत गुप्तेच्या जात या रॅप सॉंगची गीतरचना समीर सामंत यांची असून संगीत विक्रम बाम यांनी दिलं आहे. अवधूत गुप्तेने या गाण्यातून आपल्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.