मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अवधूत गुप्ते शिंदे गटात? शिवसेना गीतामुळे झालेल्या चर्चांवर पहिल्यांदा दिलं उत्तर

अवधूत गुप्ते शिंदे गटात? शिवसेना गीतामुळे झालेल्या चर्चांवर पहिल्यांदा दिलं उत्तर

अवधूत गुप्ते

अवधूत गुप्ते

गायक अवधूत गुप्तेनं शिवसेना गीत गायल्यानं त्याच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत एकच चर्चा रंगल्या. या चर्चांवर अवधूतनं उत्तर देत सोशल मीडियावर महत्त्वाचा खुलासा केलाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 06 ऑक्टोबर : यंदा मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पाहायला मिळाले. शिवाजी पार्कात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा तर बीकेसीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा रंगला. दोन्ही मेळाव्याचं दणकून प्रमोशन करण्यात आलं. आरोप प्रत्यारोप, टोलेबाजी करण्यात आली. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं शिवसेनेचं नवं गाण प्रदर्शित केलं. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेनं शिंदेंच्या दसरा मेळाव्यात हे गाणं गायलं. अवधूतसह अनेक कलाकरांनी शिंदेच्या मेळाव्यात बीकेसीमध्ये हजेरी लावली होती. अवधूत गुप्तेनं शिवसेना गीत गायल्यानं अवधूत शिंदे गटात सामील झाला का असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र यावर अवधूतनं पहिल्यांदा उत्तर दिलं आहे.

गायक अवधूत गुप्ते मागचे काही दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक कार्यक्रमात दिसला. नुकत्याच झालेल्या मराठी दांडीयामध्ये देखील अवधूत गुप्तेनं महत्त्वाची भूमिका घेतली.  काही दिवसांआधीच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला अवधूत दिसला होता. त्यानंतर थेट शिंदेंच्या बीकेसी मेळाव्यात शिवसेना गीत गायल्यानंतर अवधूत गुप्तेच्या राजकारणातील प्रवेशाविषयी अनेक चर्चा रंगल्या.

हेही वाचा - Dasara Melava : शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात 'आव्वाज' उद्धव ठाकरेंचा नाही तर... कुणी मोडलं रेकॉर्ड

अवधूत गुप्ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगत असताना गायकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. अवधूतनं म्हटलंय, 'रसिक मायबाप , BKC वर काल दरऱ्यानिमित्य झालेल्या मेळाव्यात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंच्या आमंत्रणानुसार ‘एक गायक म्हणून’ दोन गाणी सादर केली! या पार्शवभूमीवर गैरसमजातून काही प्रसारमाध्यमांनी मी "शिंदे गटात प्रवेश " केल्याच्या बातम्या दिल्या. माझ्याकडे अद्याप कोणत्याही पक्षाचं साधं प्राथमिक सदस्यत्व पण नाही. तसेच मी कोणत्याही पक्षात किंवा गटात प्रवेश केलेला नाही. तुम्ही माझा प्रेक्षकवर्ग, चाहते , फॉलोवर्स हे माझे मायबाप आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टीच स्पष्टीकरण देणं हे मी माझं उत्तरदायित्व समजतो! मी ह्या आधीही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरून माझी कला सादर केल्याचे तुम्ही जाणताच! माझ्या लेखी हा विषय इथेच संपला'.

त्याचप्रमाणे अवधूतनं एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटलंय, 'मी शिंदे गटासाठी गाणं गातो याचा अर्थ मी त्या पक्षाचं सदस्यत्व घेतलं असं होत नाही.   कलाकार हा फक्त कलाकार असतो. मी याआधीही अनेक राजकीय पक्षांसाठी गाणी गायली आहेत. लिहिली आहेत त्याचप्रमाणे म्युझिकही दिलं आहे. शिंदे गटासाठी मी वेगळं गाणं केलेलं नाही. महेश चिनार यांनी बनवलेलं गाणं मी केवळ गायलं आहे. मी गाणं गायलं म्हणजे मी पक्षाचं सदस्यत्व घेतलं असं होत नाही'.

अवधूतसह शिंदेंच्या दसरा मेळाव्यात गायक नंदेश उमप, स्वप्निल बांदोडकर आदी गायकही उपस्थित होते. त्याचप्रमाणे धर्मवीर मु्क्काम पोस्ट ठाणे सिनेमाचा दिग्दर्शक प्रविण तरडे, अभिनेता प्रसाद ओक, शरद पोक्षेही उपस्थित होते. अभिनेता प्रसाद ओकनं लिहिलेल्या माझा आनंद या पुस्तकाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लाखो लोकांसमोर प्रमोशन देखील करण्यात आलं.

First published: