Home /News /entertainment /

Sur Nava Dhyas Nava: रिऍलिटी शोच्या जगतात एक आगळा वेगळा उपक्रम VIRAL; दोन प्रसिद्ध संगीतकारांचं होतंय कौतुक

Sur Nava Dhyas Nava: रिऍलिटी शोच्या जगतात एक आगळा वेगळा उपक्रम VIRAL; दोन प्रसिद्ध संगीतकारांचं होतंय कौतुक

रिऍलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या गायकांच्या भविष्याचा विचार करत कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम एक वेगळा उपक्रम राबवताना दिसणार आहे.

    मुंबई 06 ऑगस्ट: रिऍलिटी शो म्हणलं की नेहमी समोर येतात ते अनावश्यक खतपाणी घालून केलेले रंगतदार प्रयोग. कधीच कुठल्याच रिऍलिटी शोमध्ये खरेपणा दिसतो का असा प्रश्न रिऍलिटी शोबाबत नेहमीच विचारला जातो. हे कथाबाह्य कार्यक्रम कधीतरी एवढ्या ओढून ताणून गोष्टी तयार करतात की त्याचा प्रेक्षकांना कंटाळा येतो हे दिसून आलं आहे. पण कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा हा गायांशी संबंधित (avadhoot gupte kaushal inamdar reality show) रिऍलिटी शो सध्या त्यामध्ये होणाऱ्या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने नावारूपास येताना दिसत आहे. गायनाच्या कार्यक्रमांमधून प्रसिद्ध होणारे गायक ते त्यांचा प्ले-बॅक सिंगिंग पर्यंतचा प्रवास बराच मोठा आणि खडतर असतो. कार्यक्रमात एखाद्या वेगळ्या गायकाची प्रसिद्ध झालेली गाणी मेहनत करून गाणं आणि स्वतःच रेकॉर्ड केलेलं गाणं समोर नेणं यात जमीन आस्मानाचा फरक आहे. तोच फरक ओळखून अवधूत गुप्ते या कार्यक्रमाच्या परीक्षण करणाऱ्या प्रसिद्ध गायक, संगीतकाराने एक वेगळीच शक्कल लढवली असल्याचं समोर आलं आहे. दर आठवड्याला मानाची कट्यार मिळवणाऱ्या गायक स्पधर्कासाठी खास नवं गाणं लिहून ते संगीतबद्ध करून रेकॉर्ड करून पुढच्या आठवड्यात सादर करावं असा नवा उपक्रम कार्यक्रमात सुरु होताना दिसणार आहे. यासंबंधी कौशल इनामदार या संगीतकाराने अवधूत गुप्ते यांच्याशी हातमिळवणी करत या प्रयोगात सहभाग घ्यायचं ठरवलं आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे, “काही दिवसांपूर्वी मला Avadhoot Gupteचा फोन आला. तो म्हणाला की 'सूर नवा ध्यास नवा' या Colors Marathi या वाहिनीवर होणार्‍या कार्यक्रमात एक नवीन संकल्पना राबवावी असं त्याच्या मनात आहे. प्रत्येक आठवड्याला जो गायक त्या आठवड्याचा सर्वोत्कृष्ट गायक होईल त्याच्यासाठी एक नवीन गाणं करून ते ध्वनिमुद्रित करायचं. हे सगळं एका आठवड्याच्या काळात करायचं. हे ही वाचाKaushal Inamdar: 'रिऍलिटी शो'मध्ये गाणाऱ्या गायकांचं पुढे काय होतं? कौशल इनामदार यांची पोस्ट चर्चेत म्हणजे ज्या दिवशी आठवड्याचा 'राजगायक' अथवा सर्वोत्कृष्ट गायक निवडला जाईल त्या दिवशी मी 'सूर नवा...'च्या सेटवर जायचं, जो गायक अथवा गायिका जिंकेल, त्याला किंवा तिला जेत्याची कट्यार प्रदान करायची, दुसऱ्या दिवशी त्या गायकाच्या आवाजाच्या पोताचा, पट्टीचा अंदाज घ्यायचा. खास त्याच्या किंवा तिच्या आवाजाला शोभेल असं नवं गीत लिहून घेऊन त्याला संगीत द्यायचं आणि पुढच्या दोन दिवसात ते गाणं ध्वनिमुद्रित करून पुढच्या आठवड्याच्या भागात ते सादर करायचं! मला अवधूतचा हा प्रस्ताव आनंददायी आणि आव्हानात्मक असा दोन्ही वाटला. एखाद्या अनोळखी, तरूण गायकासाठी नवं गाणं करायचं आणि तेही एका आठवड्याच्या अवधीत हे माझ्यासाठीसुद्धा उत्साहवर्धक होतं! गेल्या आठवड्यात कट्यारीचा हा मान मिळवणारा गायक होता सांगलीचा Shubham Satpute. दुसऱ्या दिवशी मी शुभमच्या आवाजाची चाचणी घेतली. Milind Joshi या माझ्या मित्राला गाणं लिहिण्याची विनंती केली. त्याला म्हटलं की शुभमच्या वयाला साजेसं गाणं करूया.” हे गाणं अवधूत गुप्ते यांच्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध असून सध्या रिऍलिटी शोच्या जगतात घडून येणाऱ्या या नव्या प्रयोगाचं खूपच कौतुक होताना दिसत आहे. रिऍलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या गायकांचं भविष्य उज्वल असावं यासाठी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं सांगितलं जात आहे.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Colors marathi, Reality show, Singer

    पुढील बातम्या