मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

20 वर्षांपूर्वी दुबईत थाटलेल्या रेस्टॉरंटमध्ये नव्वदीतल्या आशाताईंनी बनवली खमंग बिर्याणी; Video व्हायरल

20 वर्षांपूर्वी दुबईत थाटलेल्या रेस्टॉरंटमध्ये नव्वदीतल्या आशाताईंनी बनवली खमंग बिर्याणी; Video व्हायरल

गायिका आशा भोसले यांच्या दुबईतील हॉटेलविषयी तुम्हाला माहितीये का? त्याच हॉलेटमध्ये बिर्याणी बनवतानाचा आशा ताईंचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

गायिका आशा भोसले यांच्या दुबईतील हॉटेलविषयी तुम्हाला माहितीये का? त्याच हॉलेटमध्ये बिर्याणी बनवतानाचा आशा ताईंचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

गायिका आशा भोसले यांच्या दुबईतील हॉटेलविषयी तुम्हाला माहितीये का? त्याच हॉलेटमध्ये बिर्याणी बनवतानाचा आशा ताईंचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 10 ऑगस्ट: भारतीय सिनेसृष्टीला लाभलेल्या काही उत्कृष्ट गायिकांमधील एक नाव म्हणजे आशा भोसले. प्रसिद्ध गायिका आशा भोसले या सोशल मीडियावर बऱ्यापैकी अँक्टिव्ह असतात. अनेक व्हिडीओ, फोटो त्या शेअर करत असतात. आशा भोसले या उत्तम गायिका आहेत. मात्र मात्र स्वयंपाकातही त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. स्वयंपाकाच्या याच आवडीमुळे आशा भोसले यांनी  20 वर्षांपूर्वीच एकच रेस्टॉरंट सुरू केले. हे रेस्टॉरंट भारतात नाही तर दुबईमध्ये आहे. आशा ताईंना गाण्याव्यतिरिक्त हॉटेल व्यावसायात रुची होती. त्यामुळे त्यांनी 20 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेस्टॉरंटची साळखी उघडली आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या. त्यांच्या यात दुबईतील हॉटेलमधील त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात नव्वदीतल्या आशा ताई आपल्या हातानं खमंग बिर्याणी बनवताना दिसत आहेत. दुबईमध्ये 'आशाज' नावाचं कॉन्टिनेंटल इंडियन कुझिन्स मिळाणारं रेस्टॉरंट आहे. दुबई, कुवेत, अबू धाबी, दोहा, बहरेन अशा विविध ठिकाणी आशा ताईंची हॉटेल्स आहेत. दुबईच्या  WAFI मॉलमध्ये असलेल्या आशाज या रेस्टॉरंटमधला व्हिडीओ आशाताईंनी शेअर केला आहे. आशा ताई सध्या त्यांची नात जनाईबरोबर दुबईमध्ये आहेत. दुबईत पोहोचताच आजी नातीनं त्यांच्या रेस्टॉरंटला भेट दिली. इतक्या दिवसांनी रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर शांत बसतील त्या आशा ताई कसल्या. त्यांनी पदर खोचला आणि थेट रेस्टॉरंटच्या लॉविश किचनमध्ये खमंग दम बिर्याणी बनवली. हेही वाचा - Takatak 2 tariler: इंद्राजींचा कधीही न पाहिलेला धमाल कॉमेडी अवतार; टकाटक 2 ट्रेलर आउट
View this post on Instagram

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

आशा ताईंची नात जनाईनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जनाई रेस्टॉरंटमध्ये एंट्री करताने दिसतेय. रेस्टॉरंटच्या एंटरन्सची छोटीशी झलकही पाहायला मिळतेय. रेस्टॉरंटमध्ये आशा ताई आणि मंगेशकर कुटुंबियांच्या जुन्या आठवणींचे फोटो लावण्यात आलेत. पुढच्या व्हिडीओमध्ये आशा ताई किचनमध्ये पदर खोचून एप्रिन घालून चमचमीत खमंग बिर्याणी बनवताना दिसत आहेत.  इतकंच नाही तर आशा ताईंनी त्यांच्या हातानं सगळ्यांना बिर्याणी खाऊ देखील घातली आहे. आशा भोसले यांच्या नातीविषयी सांगायचं झालं तर जनाई भोसले ही आशा ताईंचा धाकटा मुलगा आनंद भोसले यांची मुलगी आहे.  घरात शास्त्रीय संगातीचा वारसा लाभलेली जनाई देखील गाण्यात पारंगत आहे.  आशा भोसले यांनी जनाईला तू लता मंगेशकर हो असा आशिर्वाद दिला आहे. लता दीदींसारखी गाणी तिनं गावीत अशी त्यांची इच्छा आहे. जनाईनं कथ्थक नृत्यात विशारद केलं आहे.  आजी आणि नातीची जोडी सोशल मीडियावर हीट ठरली आहे.
First published:

Tags: Marathi entertainment, Singer

पुढील बातम्या