हास्यजत्रेत सुरांची मैफल; अनु मलिक गाणार मंत्रमुग्ध करणारी गाणी

हास्यजत्रेत सुरांची मैफल; अनु मलिक गाणार मंत्रमुग्ध करणारी गाणी

महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये अनु मलिक यांचं आगमन; सुरेल गाणी गात केलं मराठी कलाकारांचं कौतुक

  • Share this:

मुंबई 3 मे : सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनी वरील विनोदी मालिका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra)  कोरोनाच्या या कठीण काळतही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर आता या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अनु मलिक (Anu Malik) यांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे कार्यक्रमाला एक सुरेल रुप आलं आहे. कोरोना तसेच लॉकडाउन मुळे (Maharashtra lockdown) राज्यभरातील संपूर्ण चित्रिकरण बंद आहे. त्यामुळे इतर मालिकांप्रमाणेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची स्पूर्ण टिम दमनला (Daman) पोहोचली आहे. तर तिकडे आता  मालिकेचे चित्रिकरण होत आहे.

मालिकेच्या येत्या एपिसोड्स मध्ये 3 आणि 4 तारखेच्या भागात अनु मलिक हे प्रमुख पाहून म्हणून कार्यक्रमात दिसणार आहेत. याचाच एक प्रोमो सोनी मराठीने प्रसारित केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. प्रोमोत अनु मलिक कार्यक्रमातील कलाकारांसोबत धमाल करताना दिसत आहेत.

अनु मलिक यांनी अभिनेता तसेच कार्यक्रमाचा जज प्रसाद ओक (Prasad Oak) याच्याबरोबर ‘आम्ही ढोलकर’ हे मराठी गाणंही त्यांनी गायलं. याशिवाय सेट वर प्रचंड धमाल केली. तसेच त्यांना कार्यक्रमातील सर्व कलाकारंच कौतुकही केलं. या विनोदी मालिकेत अनेक मात्तबर विनोदवीर प्रेक्षकांच मनोरंजन करताना दिसून येतात. समीर चौगुले, विशाखा सुभेदार, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे आणि गौरव मोरे हे कालाकर गेले अनेक दिवस प्रेश्रकांना खळखळून हसवत आहेत.

मराठी कलाकारांनी कोरोनाला कसं हरवलं?; अनुभवाद्वारे केलं चाहत्यांना सावध

अभिनेत्री सई ताम्हनकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक हे कार्यक्रमाचे परिक्षक असून अभिनेत्री प्राजक्ता माळी  (Prajakta Mali) कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करते. अनु मलिक यांच्या उपस्थितीने मालिकेच्या सेट वर आनंददायी वातावरण पाहयला मिळत आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Ulta Chashma)  या लोकप्रिय मालिकेच्या कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

Published by: News Digital
First published: May 3, 2021, 6:32 PM IST

ताज्या बातम्या