Home /News /entertainment /

बॉलिवूडचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' अडकणार लग्नाच्या बेडीत; 10 वर्षांच्या रिलेशननंतर चढणार बोहल्यावर

बॉलिवूडचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' अडकणार लग्नाच्या बेडीत; 10 वर्षांच्या रिलेशननंतर चढणार बोहल्यावर

वडिलांकडून मिळालेली गायकी आणि अँकरिंगचं जबरदस्त भन्नाट टॅलेंट या कलाकारामध्ये आहे. जवळजवळ 10 वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर त्याने लग्नाचा निर्णय घेतला आहे.

  मुंबई, 27 नोव्हेंबर: बॉलिवूडमध्ये या वर्षी सिनेमांच्या चर्चांपेक्षा कलाकारांची लग्न आणि अभिनेत्रीच्या गरोदरपणाचेच किस्से जास्त रंगले आहेत. छोट्या पडद्यावरचा मोस्ट एलिजिबल बॅचलर, सिंगर आदित्य नारायण (Aditya Narayan) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. श्वेता अग्रवालसोबत (Shweta Aggarwal) 1 डिसेंबर रोजी त्याचं लग्न होणार आहे. श्वेता आणि आदित्य यांच्या रिलेशनच्या चर्चा फार दिवसांपासून रंगल्या होत्या. कसं असेल कोरोना काळातलं लग्न? आदित्य नारायणने स्वत: याबाबत माहिती दिली. आदित्य म्हणाला, ‘आमचं लग्न अतिशय साध्या पद्धतीने होणार आहे. आमच्या अतिशय जवळचे मित्र आणि कुटुंबातले काही मोजकेच सदस्य या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.  या लग्नाला 50 पेक्षा जास्त लोकं उपस्थित राहणार नाहीत.’ ऑक्टोबर महिन्यामध्येच या दोघांनी आपल्या रिलेशनशीपबद्दल माहिती दिली होती. आदित्य आणि श्वेताची पहिली भेट शापित सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. आदित्यची ही पहिलीच फिल्म होती. 2010 पासून हे दोघंही एकमेंकांना ओळखत आहेत.
  जवळजवळ 10 वर्ष एकमेंकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि आदित्य नारायणच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण या दोघांनीही त्या अफवाच असल्याचं सांगितलं. नेहा कक्करने गेल्याच महिन्यात पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहशी लग्न केलं आणि आता आदित्य नारायण आणि श्वेता लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood, Wedding

  पुढील बातम्या