मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अली जफरला लैंगिक शोषण प्रकरणी दिलासा; अभिनेत्रीला 3 वर्षांचा तुरुंगवास

अली जफरला लैंगिक शोषण प्रकरणी दिलासा; अभिनेत्रीला 3 वर्षांचा तुरुंगवास

कलाकारावर काही वर्षांपूर्वी अभिनेत्री, गायिका मिशा शफी (Meesha Shafi) हिनं लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. हे आरोप कोर्टात खोटे सिद्ध झाले आहेत.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 14 मार्च: अली जफर (Ali Zafar) हा एक प्रसिद्ध गायक आहे. मुळचा पाकिस्तानी असलेल्या या गायकानं आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. शिवाय त्यानं अभिनेता म्हणून देखील बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. या कलाकारावर काही वर्षांपूर्वी अभिनेत्री, गायिका मिशा शफी (Meesha Shafi) हिनं लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. हे आरोप कोर्टात खोटे सिद्ध झाले आहेत. परिणामी खोटे आरोप करुन अभिनेत्याची बदनामी केल्याप्रकरणी मिशा शफी हिला तब्बल तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Sexual Harrashment case)

प्रकरण काय आहे?

तीन वर्षांपूर्वी संपूर्ण मनोरंजनसृष्टी महिला कलाकारांनी सुरु केलेल्या #मीटू या चळवळीमुळं हादरली होती. या चळवळीचे पडसाद बॉलिवूडमध्येही पाहायला मिळाले. अनेक अभिनेत्रींनी नामांकित निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. याच चळवळी दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री मिशा शफी हिनं अली जफरवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानं काम देण्याच्या नावाखाली माझा लैंगिक छळ केला असा खळबळजनक आरोप तिनं केला होता. या आरोपांमुळं अलीच्या करिअरला उतरती कळा लागली. बॉलिवूड निर्मात्यांनी देखील त्याला काम देण्यास नकार दिला.

‘ती महिलाच खरी दोषी...’; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी

अर्थात हे आरोप त्यानं वारंवार फेटाळले होते. पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं. याच वेळी त्यानं शफी विरोधात मानहानीचा दावा देखील ठोकला होता. अखेर अभिनेत्रीला कोर्टात कुठलाही आरोप सिद्ध करता आला नाही. त्यामुळं खोटे आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी शफीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अरोपांतून सुटताच अलीनं समाधान व्यक्त केलं. “जोपर्यंत ती सार्वजनिकपणे माफी मागणार नाही तोपर्यंत मिशाला माफ करणार नाही.” अशी प्रतिक्रिया त्यानं दिली.

First published:

Tags: Crime, Entertainment, Marathi entertainment