गायक अभिजीतची ट्विटरनं केली बोलती बंद

गायक अभिजीतची ट्विटरनं केली बोलती बंद

आता खुद्द ट्विटरनंच त्याचं अकाऊंट ब्लाॅक केलंय. नुकतीच अभिजीतनं जेएनयू नेता शेहला रशिद यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केलं होतं.

  • Share this:

24 मे : आपल्या वादग्रस्त ट्विटसनी गायक अभिजीत नेहमीच चर्चेत राहिलाय. पण आता खुद्द ट्विटरनंच त्याचं अकाऊंट ब्लाॅक केलंय. नुकतीच अभिजीतनं जेएनयू नेता  शेहला रशिद यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केलं होतं.

अभिजीत म्हणालाय, ' माझं अकाऊंट ब्लाॅक होण्यामागे अरुंधती राॅय आणि जेएनयूचे समर्थक आहेत. ते परेश रावलचा अकाऊंटही ब्लाॅक करण्याचा प्रयत्न करतायत. पण मला काही फरक पडत नाही. सगळा देश माझ्यासोबत आहे.'

अलिकडेच परेश रावलनंही अरुंधती राॅयबद्दल वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यात म्हटलं होतं की अरुंधती राॅयला काश्मीरमध्ये लष्कराच्या जिपला बांधून फिरवायला हवं. आणि त्याला रिट्विट करत अभिशेकनं अरुंधती राॅयला गोळी मारली पाहिजे असंही म्हटलं होतं.

यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. ट्विटरलाच हे अकाऊंट ब्लाॅक करायला सांगितलं होतं.  ट्विटरवरचे अभिजीतचे हे 'बेसूर' आता कायमचेच थांबले म्हणायचं.

दरम्यान सोनू निगमनं अभिजीतला समर्थन देण्यासाठी स्वत:चं ट्विटर अकाऊंट डिलीट केलं. तेही फॅन्सची क्षमा मागून.

First published: May 24, 2017, 11:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading