निलेश साबळेकडे रोहित शेट्टीनं मागितले 'याचे' राइट्स!

थुकरटवाडीत चेन्नई एक्सप्रेस आणि सिंघम या चित्रपटांवर आधारित विनोदी स्किट सादर करण्यात आलं. या धमाकेदार स्किटने सर्व कलाकारांना पोट धरून हसायला लावलं.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 07:47 AM IST

निलेश साबळेकडे रोहित शेट्टीनं मागितले 'याचे' राइट्स!

मुंबई, 21 डिसेंबर : चला हवा येऊ द्या हा शो अनेक वर्ष सुरू आहे. प्रत्येक भागात आपण कलाकारांची धमाल बघतोच. अनेक मराठी कलाकार या शोमध्ये येत असतातच. पण आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, रितेश देशमुख, इरफान खान, जॉन अब्राहम, रवीना, नाना पाटेकर, विद्या बालन यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या मंचावर हजेरी लावली.

पुढच्या आठवड्यात शोमध्ये सिंबाची टीम दिसणार आहे. त्याचं शूटिंग नुकतंच झालं. रणवीर सिंग, सारा अली खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी, तसंच चित्रपटातील बाकीची कास्ट अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, सुचित्रा बांदेकर, अश्विनी काळसेकर, सौरभ गोखले आणि अशोक समर्थ हे देखील उपस्थित होते.

आता हे कलाकार थुकरट वाडीत सज्ज होणार म्हटल्यावर विनोदवीरांनीदेखील धमाल केली. थुकरटवाडीत चेन्नई एक्सप्रेस आणि सिंघम या चित्रपटांवर आधारित विनोदी स्किट सादर करण्यात आलं. या धमाकेदार स्किटने सर्व कलाकारांना पोट धरून हसायला लावलं. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना त्यांचं हे स्किट इतकं आवडलं की रोहितने सगळ्यांचं तोंडभरून कौतुक तर केलंच पण त्याच सोबत त्याने निलेशकडे या स्किटचे राईट्स मागितले. त्या स्किटवर चित्रपट बनवायला आवडेल असंही म्हणाला.

सिंबाच्या प्रमोशन दरम्यान दिग्दर्शक रोहित शेट्टीनं एक गुपित उलगडलं आहे. ते म्हणाला, मला असा एक सिनेमा बनवायचाय, ज्यात सिंघम आणि सिंबा एकत्र असतील. आतापर्यंतच्या हिंदी सिनेमात असं झालेलं नाही. पण आता ते करण्याचा माझा प्रयत्न आहे.'

रोहित म्हणाला, 'प्रेक्षकांना सिंघम आवडलाय. त्या दोन व्यक्तिरेखांना एकत्र आणलं तर धमाका होईल.' रोहित सिंबा 2वरही काम सुरू करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 07:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...