मुंबई, 02 डिसेंबर : अभिनेत्री विद्या बालनचा डर्टी पिक्चर तुम्हाला आठवत असेल. विद्या बालनच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात वेगळा सिनेमा ठरला. साऊथ अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा होता. सिल्क स्मिताचा प्रवास सिनेमात दाखवण्यात आला होता. मात्र तिच्या मृत्यूचं गुढ आजही कायम आहे. हिंदी सिनेमात अनेक अभिनेत्री आल्या आणि हिट झाल्या. पण त्यातील काहीच अभिनेत्री प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे सिक्ल स्मिता. झिरो पासून करिअरला सुरूवात केलेली सिक्ल स्मिता ही अल्पावधीतच हिरो झाली. फार कमी वयात लग्न झालेल्या सिल्क स्मितानं लोकांच्या घरची भांडी घासली तर कधी हिरोइनचा मेकअपही केला. 17 वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास 400 हून अधिक साऊथ आणि हिंदी सिनेमात काम करणाऱ्या स्मितानं वयाच्या 36व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. आज तिच्या वाढदिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
सिल्क स्मिता ही मुळची साऊथची. तिचा जन्म 2 डिसेंबर 1960मध्ये एका तेलुगु परिवारात झाला. वयाच्या10व्या वर्षीच घरातील आर्थिक परिस्थितीमुळे तिला शिक्षण सोडावं लागलं. घरात खाणारी तोंड जास्त असल्यानं स्मिताचं लग्न लावून देण्यात आलं. सासरी गेलेल्या स्मिताला मात्र चांगली वागणूक मिळत नव्हती. नवरा, दिर आणि सासूकडून तिला मारहाण केली जायची. एक दिवस या जाचाला कंटाळून ती चेन्नईला निघून गेली. त्यानंतर तिनं मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरूवात केली. ती हिरोईनचा टचअप करायला जायची आणि तिथेच तिच्या डोक्यात हिरोइन व्हायचा किडा गेला.
हेही वाचा - Boman Irani : ताज हॉटेलमध्ये वेटर ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते, असा आहे बोमन इराणींच्या अभिनयाचा प्रवास
अभिनेत्रीनं 'वंदीचक्करम' या तमिळ सिनमातून तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. सुरूवातीच्या काळात ती छोट्या भूमिका करत होती. 17 वर्षांच्या करिअरमध्ये 400 हूनअधिक सिनेमात तिनं काम केलं. सिल्क स्मिता सिनेमात जास्त अभिनय करत नव्हती. ती प्रत्येक सिनेमात एक गाण शुट करायची. 1980 मध्ये आलेल्या वंदीचक्करम या सिनेमानं तिला प्रसिद्धी मिळवून दिली. सिल्क स्मिता हे नाव घराघरात ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर रजनिकांत , कमल हसन सारख्या दिग्गज कलाकारांबरोबर तिनं अनेक वेळा काम केली. रजनिकांत यांच्याबरोबर तिच्या अफेअर्सच्या चर्चा ही रंगल्या होत्या.
23 डिसेंबर 1986 साली सिल्क स्मिता राहत्या घरात पंख्याला लटकलेली आढळली. दारूच्या नशेत तिनं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात. तिच्यावर कर्जाचा डोंगर होता त्यात तिला दारू पिण्याची सवय लागली होती आणि या सगळ्यातून तिनं आत्महत्या केली असं म्हटलं जातंय. तिन तेलुगू भाषेत सुसाइट नोटही लिहीली होती. मात्र ती केस पोलिसांकडून बंद करण्यात आली.
2011मध्ये एकता कपूर हिनं सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित डर्टी पिक्चर प्रेक्षकांसमोर आणला होता. यात अभिनेत्री विद्या बालन हिनं सिल्क स्मिताची प्रमुख भूमिका साकारली होती. हा सिनेमा त्या वर्षी ब्लॉकबस्टर झाली होती. सिनेमानं वर्ल्ड वाइड 117 करोडची कमाई केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News