S M L

महिलांच्या सन्मानासाठी कान फिल्म फेस्टिव्हलच्या पायऱ्यांवर अभिनेत्र्यांनी केलं मूक आंदोलन

कायमच अभिनेत्रींच्या वेशभूषांनी, गाऊन्सनी जो महोत्सव जगभरात चर्चिला जातो तो कान महोत्सव यंदा आणखी एका कारणाने गाजला. आणि ते कारण होत निदर्शनाचं.

Renuka Dhaybar | Updated On: May 13, 2018 06:55 PM IST

महिलांच्या सन्मानासाठी कान फिल्म फेस्टिव्हलच्या पायऱ्यांवर अभिनेत्र्यांनी केलं मूक आंदोलन

13 मे : कायमच अभिनेत्रींच्या वेशभूषांनी, गाऊन्सनी जो महोत्सव जगभरात चर्चिला जातो तो कान महोत्सव यंदा आणखी एका कारणाने गाजला. आणि ते कारण होत निदर्शनाचं. ही निदर्शनही कुणी अशा तशा व्यक्तीनी केली नव्हती तर निदर्शन कर्त्या होत्या आताच्या प्रसिद्ध अभिनेत्री.

जवळपास 82 अभिनेत्री आणि इतर महिला आर्चिस्टनी कानच्या पायऱ्यांनर आपला निषेध नोंदवला तो महिलांना समान वागणूक मिळावी यासाठी. सलमा हायक आणि जेन फोंडा यांसोबत एकूण 82 जणींना यात भाग घेतला. यात यंदाच्या ज्युरी मेंबरमधल्या पाच सदस्या होत्या.

महिला या जगात अल्पसंख्याक नाहीत आम्ही सगळ्याजणी या पायऱ्यांवर यासाठी उभ्या आहोत ते परिवर्तन आणि प्रगतीसाठी असं या निदर्शनांनतर या महिलांनी म्हटलं आहे.

आमच्या क्षेत्राची दार सर्वांसाठी खुली व्हावीत हा आमचा उद्देश आहे. असं मतही त्या अभिनेत्रींनी व्यक्त केलं. आणि इतरवेळेला वेशभूषेने चर्चिला जाणाऱ्या या फेस्टिव्हलला आज खऱ्या अर्थाने वास्तवाचीही चुणूक मिळाली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2018 06:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close