मुंबई, 6 सप्टेंबर : तरुण अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं नुकतंच निधन झालं. हा टीव्हीवरचा गुणी अभिनेता गेल्याचं वृत्त आल्यानंतर बॉलिवूडसह समस्त टीव्हीजगताला (Bollywood & TV Industry) धक्का बसला. आपल्या अभिनयानं टीव्ही क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या या अभिनेत्याला सोशल मीडियावर अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. तो वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो शेअर करून कायम त्यांच्या संपर्कात रहायचा.
सिद्धार्थ खासगी आयुष्याबद्दल (Personal Life) बाहेर फारसं बोलायचा नाही पण बिग बॉस 13 मध्ये त्याच्या वागण्याबद्दल आयुष्याबद्दल जाणून घ्यायची संधी प्रेक्षकांना मिळाली होती. त्यातच त्याने त्याच्या एका व्यसनाचा उल्लेख केला होता. जे त्याला सोडायची इच्छा होती. याबाबतचं वृत्त बॉलिवूड लाइफ नं दिलं आहे.
दीड ते दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थ बिग बॉस 13 या शोमध्ये सहभागी झाला होता आणि तो त्याचा विजेताही ठरला होता. त्यात आपली आधीची गर्लफ्रेंड शेफाली जरिवाला हिच्याशी बोलताना हे मान्य केलं होतं की त्याला सिगरेट ओढण्याचं प्रचंड व्यसन होतं. ती सवय काही केल्या सुटत नाही त्यामुळे तौ वैतागला होता. तो हे बोलत असताना सिद्धार्थच्या शेजारी विशाल आदित्य सिंह बसले होते. सिद्धार्थ तेव्हा म्हणाला होता की त्याला त्याची फुफ्फुसं स्वच्छ करून घेण्याची म्हणजे लंग क्लिनिगची इच्छा होती. लंडनमध्ये ही सर्व ट्रिटमेंट व्यवस्थित होईल आणि त्याच्या फुफ्फुसांमधला साठलेला काळा कार्बन बाहेर काढला जाईल असा त्याला विश्वास होता.
हे ही वाचा-
सिद्धार्थच्या जाण्याने भावुक झाला करण जोहर; पाहा अभिनेत्याविषयी काय म्हणाला
तसं सिद्धार्थ खासगी बाबी जाहीर करत नसे. पण त्याने कार्यक्रमात हे मत व्यक्त केल्यामुळे तो सिगरेट ओढण्याच्या व्यसनाने किती त्रस्त होता हेच लक्षात आलं होतं. त्याला लवकरात लवकर लंग क्लिनिंग ट्रिटमेंट घेऊन फुफ्फुसं स्वच्छ करून घ्यायची होती आणि त्यानंतर कदाचित त्याने हे व्यसन सोडलं असतं. नियतीनी मात्र त्याला वयाच्या 40 व्या वर्षीच बोलावून घेतलं.
सिद्धार्थप्रमाणेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना व्यसनं असतात आणि ती ते सोडण्याचा प्रयत्न करतात, उपचार घेतात. संजय दत्तला ड्रग्जचं प्रचंड व्यसन होतं ते सोडण्यासाठी त्याने अटोकाट प्रयत्नही केले होते.
दरम्यान, सिद्धार्थ शुक्लाचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराने आज संध्याकाळी 5 वाजता ऑनलाईन श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे. या सभेत सिद्धार्थच्या जवळचे मित्र, नातेवाईक सहभागी होऊन त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतील. कदाचित सिद्धार्थच्या चाहत्यांनाही या सभेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाऊ शकते, पण याबाबत अधिकृत आणि पक्की बातमी मिळालेली नाही.
सिद्धार्थ शुक्लाला सोडायचं होतं ‘हे’ व्यसन, लंडनला जाऊन घेणार होता उपचार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.