मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर कसं पडायचं? सिद्धार्थ शुक्लानं दिल्या खास टिप्स

ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर कसं पडायचं? सिद्धार्थ शुक्लानं दिल्या खास टिप्स

सिद्धार्थ शुक्लानं (Sidharth Shukla) काही खास टिप्स आपल्या चाहत्यांना दिल्या आहेत. (How to move from breakup) या टिप्स वापरुन तुम्ही देखील सहज ब्रेकअपचं दु:ख पचवू शकता असा विश्वास त्यानं व्यक्त केला आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 29 मे: प्रेयसी किंवा प्रियकरासोबत झालेलं ब्रेकअप हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक कठिण काळ असतो. या काळात अनेक जण नैराश्येत जातात. काहींना नको ती व्यसनं लागतात. तर काही जण बदला घेण्याच्या निमित्तानं स्वत:ला आणि आपल्या एक्स पार्टनरला त्रास देतात. परंतु ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर येण्यासाठी अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं (Sidharth Shukla) काही खास टिप्स आपल्या चाहत्यांना दिल्या आहेत. (How to move from breakup) या टिप्स वापरुन तुम्ही देखील सहज ब्रेकअपचं दु:ख पचवू शकता असा विश्वास त्यानं व्यक्त केला आहे.

ब्रेकअप झालेल्या व्यक्तीनं काय करावं?

मुळात ब्रेकअप झालं का? चूक कोणाची होती? मी ते प्रकरण सावरु शकलो असतो का? असे प्रश्न तुमच्या समोर सतत येतील मात्र त्याकडे दुर्लक्ष करा. याच प्रश्नांमुळं तुम्ही नैराश्येच्या गर्तेत जाऊ शकता. शक्य असेल तर कामातून काही दिवसांसाठी सुट्टी घ्या आणि ते करा ते तुम्हाला मनापासून करायला आवडतं. स्वत:वर लक्ष केंद्रित करा. जीममध्ये जा, छान पुस्तकं वाचा, कित्येक दिवसांपासून राहिलेले चित्रपट पाहा. जो पर्यंत तुमचं लक्ष इतर गोष्टींमध्ये गुंतणार नाही तो पर्यंत तुम्हाला ते ब्रेकअप आठवतच राहणार. तो व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नव्हता. तुम्ही आणखी चांगला व्यक्ती डिझर्व करतात. हा विचार मनात पक्का बसवा. असा सल्ला सिद्धार्थनं आपल्या चाहत्यांना दिला.

तारक मेहतामधील संस्कारी टप्पू खऱ्या आयुष्यात उद्धट? जेठालालनं उचललं मोठं पाऊल

बिग बॉस फेम सिद्धार्थची ब्रोकन बट ब्युटिफुल ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीरिजच्या निमित्तानं बॉलिवूड लाईफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत त्याने या टीप्स दिल्या. ही सीरिज प्रामुख्यानं ब्रेकअवरच आधारित आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजमधील एक सीन लीक झाला होता. यामध्ये तो सोनिया राठीसोबत किसिंग सीन करताना दिसत होता. या सीनसाठी काही नेटकऱ्यांनी सिद्धार्थला ट्रोल देखील केलं होतं.

First published:

Tags: Big boss, Entertainment