मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिद्धार्थ शुक्लावर आज सकाळी मुंबईत होणार अंत्यसंस्कार, 11 वाजता पार्थिव कुटुंबियांकडे करणार सुपूर्द

सिद्धार्थ शुक्लावर आज सकाळी मुंबईत होणार अंत्यसंस्कार, 11 वाजता पार्थिव कुटुंबियांकडे करणार सुपूर्द


तर दुसरीकडे, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आणखी एक गोष्ट समोर येत आहे, असे सांगितले जात आहे की, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्ला...

तर दुसरीकडे, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आणखी एक गोष्ट समोर येत आहे, असे सांगितले जात आहे की, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्ला...

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या (Sidharth Shukla heart attack) झटक्यानं निधन झालं.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 03 सप्टेंबर: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या (Sidharth Shukla heart attack) झटक्यानं निधन झालं. गुरुवारी सकाळी अभिनेत्यानं अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या अकाली एक्झिटनं सर्वांनाच धक्का बसला आहे. आज मुंबईत सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. Sidharth Shukla passes away

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं पार्थिव आज सकाळी 11 वाजता त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल. समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थचं पार्थिव ब्रम्हाकुमारी कार्यालयात नेण्यात येईल. तिथे पूजा पाठ होईल. त्यानंतर त्याचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. सिद्धार्थचं घर ओशिवरामध्ये आहे. त्यामुळे ओशिवराच्या वैकुंठभूमी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Sidharth Shukla Death: पहाटे 3 वाजता आईने दिला थंड पाण्याचा ग्लास, त्यानंतर तो झोपला ते उठलाच नाही

सिद्धार्थच्या निधनानंतर मैत्रीण शेहनाझ दुःखात

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे लाखो तसेच त्याचे जवळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींकडूनही शोक व्यक्त केला जात आहे. बिगबॉस शोमधून नावरुपास आलेली जोडी शेहनाझ गिल (Shenaaz Gill) सिद्धार्थ अगदी जवळचे मित्र होते. त्याच्या जाण्याने शेहनाझवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाझ गिल बिग बॉस 13 मध्ये एकमेकांना भेटले होते. त्यांची जोडी सोशल मीडियात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे.

सिधनाझ नावाने ते फारच प्रसिद्ध झाले होते. दोघांचे लाखो चाहते आहेत. सिद्धार्थच्या जाण्याने शेहनाझलाही मोठा धक्का बसला आहे. तर तिची प्रकृती ठिक नसल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. शेहनाझचे वडील संतोख सिंग सुख यांनी सांगितलं की ती सध्या बरी नाही. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत मी नाही. जे काही झालं त्यावर माझा विश्वास बसत नाही." पुढे ते म्हणाले की, "माझं तिच्याशी बोलणं झालं. ती बरी नाही. माझा मुलगा शेहबाझ तिच्याकडे मुंबईला जात आहे. मीही नंतर जाणार आहे."

First published:

Tags: Bollywood News