मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sidharth Shukla Birth Anniversary: वयाच्या 17 व्या वर्षीच सिद्धार्थने केला होता विश्वविक्रम; 'त्या' उत्तराने जिंकलं होतं चाहत्यांचं मन

Sidharth Shukla Birth Anniversary: वयाच्या 17 व्या वर्षीच सिद्धार्थने केला होता विश्वविक्रम; 'त्या' उत्तराने जिंकलं होतं चाहत्यांचं मन

सिद्धार्थ शुक्ला

सिद्धार्थ शुक्ला

करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाने अचानक एक्झिट घेतली. हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमावलेल्या सिद्धार्थची आज जयंती आहे. त्याचं अचानक जाणं चाहत्यांना खूपच हुरहूर लावून गेलं. आज जाणून घ्या त्याच्या आयुष्यातील एक खास गोष्ट

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 डिसेंबर :  असे नेहमी म्हटले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती निघून जाते तेव्हा फक्त त्याच्या आठवणी मागे राहतात, त्यांचे शब्द अजरामर ठरतात. हे अगदी खरं आहे. अनेकदा कुणीतरी गेल्यावर त्याचे शब्द आठवतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमावलेल्या सिद्धार्थची आज जयंती आहे. त्याचं अचानक जाणं चाहत्यांना खूपच हुरहूर लावून गेलं. आता  गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो वर्ल्ड बेस्ट मॉडेलचा किताब पटकावताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका चाहत्याने शेअर केला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सिद्धार्थचे मॉडेलिंग करिअर यशस्वी होते. त्याने 9 डिसेंबर 2005 रोजी तुर्कीमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेल पुरस्कार जिंकला होता. तो प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा तो पहिला आशियाई होता. या स्पर्धेदरम्यान अभिनेत्री जुही चावला त्याची जज होती.  स्पर्धेदरम्यान प्रश्नोत्तराच्या फेरीत जुहीने त्याला विचारले की त्याच्यासाठी सौंदर्य म्हणजे काय? यावर सिद्धार्थ उत्तर देतो, 'सौंदर्याचा शारीरिक स्वरूपाशी काहीही संबंध नाही, ते माणसाच्या आत असतो. कोणीही बाहेरून चांगले दिसू शकत नाही, माणसाचे हृदय त्याला आतून सुंदर बनवते.'' सिद्धार्थच्या या उत्तराने सर्वांचे मन जिंकले. आजही हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये वाहवा मिळवतो आहेत.

हेही वाचा - Shehnaaz Gill: ...अन् शहनाझ गिलला चाहतीनं थेट गुडघ्यावर बसून दिली अंगठी; VIDEO व्हायरल

सिद्धार्थचा जन्म 12 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत झाला. सिद्धार्थला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. तो टेनिस आणि फुटबॉल खेळत असे. इंटिरियर डिझायनिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने काही काळ या क्षेत्रात काम केले. यानंतर त्याने मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला आणि इला अरुणच्या म्युझिक व्हिडिओ 'रेशम का रुमाल'मध्ये पहिल्यांदा भूमिका साकारली. यानंतर, 2005 मध्ये त्याच्या वाढदिवसापूर्वी तिने वर्ल्ड बेस्ट मॉडेलचा किताब पटकावला. 40 स्पर्धकांना मागे टाकत त्याने आपल्या कौशल्याने हे विजेतेपद पटकावले.

लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला. वर्षभरानंतरही त्याच्या आठवणीत चाहते दुःखी होतात.या अभिनेत्याचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते होते. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर तो घराघरात प्रसिद्ध झाला. गेल्या वर्षी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा, सिद्धार्थ शुक्ला यांचे 2 सप्टेंबर रोजी वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.

2008 मध्ये, सिद्धार्थने करिअरची सुरुवात मनोरंजन व्यवसायात 'बाबुल का आंगन छुटे ना' मधून केली. तो बिग बॉस 13 चा विजेता होता आणि त्याने 'बालिका वधू' आणि 'दिल से दिल तक' सारख्या मालिकांमधून तो घराघरात पोहचला. आजही या अभिनेत्याची छाप प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

First published:

Tags: Entertainment, Sidharth shukla, Tv actors, Tv celebrities